नागपूर : भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आ. शोभाताई फडणवीस यांनी शुक्रवारी टोलबंद आंदोलनासंदर्भात नागपुरात घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोरखेडी व मनसर हे टोलनाके असलेल्या मार्गाच्या बांधकामात भ्रष्टाचार झाला असून, येथे अवैधरीत्या वसुली करण्यात येत असल्याचा आरोप केला होता. या सर्व अनियमिततेबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत, असे आ. फडणवीस यांनी स्पष्ट केले होते. मात्र लोकमतच्या १७ रोजीच्या अंकात केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी जनतेच्या खिशातून मोठ्या प्रमाणात अवैध वसुली करीत असल्याचे अनवधानाने प्रकाशित झाले आहे. या चुकीच्या उल्लेखामुळे निष्कारण गैरसमज निर्माण होऊ नये म्हणून स्पष्टीकरण देत आहोत.
शोभातार्इंच्या वक्तव्याबाबत गैरसमज होऊ नये
By admin | Updated: January 18, 2015 00:33 IST