शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
3
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
4
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
5
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
6
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
7
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
8
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
9
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
10
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
11
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
12
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
13
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
14
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
15
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
16
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल
17
भारताने दाखवले मोठे मन; पाकिस्तानला पुराबाबत केले सतर्क, ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच चर्चा
18
गाझातील रुग्णालयावर इस्त्रायलचा हल्ला, ४ पत्रकारांसह १४ लोक ठार; जगभरातून होतोय निषेध 
19
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
20
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक

आयुक्तांच्या आदेशाचे भय नाही !

By admin | Updated: August 16, 2014 02:40 IST

पोलीस दलातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी गटप्रमुखांवरील कारवाईचे आदेश वेळोवेळी त्या त्या आयुक्तांनी दिले. काही प्रकरणांमध्ये कारवाईही झाली

मुंबई : पोलीस दलातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी गटप्रमुखांवरील कारवाईचे आदेश वेळोवेळी त्या त्या आयुक्तांनी दिले. काही प्रकरणांमध्ये कारवाईही झाली, मात्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) या वर्षी केलेल्या कारवाईतून आयुक्तांच्या आदेशांना पोलीस भीक घालत नाहीत, हे स्पष्ट होते. या वर्षी मुंबईत एसीबीने एकूण ५२ सापळे रचून ५७ जणांना गजाआड केले. त्यापैकी १९ सापळे पोलिसांसाठी होते. त्यात एकूण २६ पोलीस अधिकारी-कर्मचारी गजाआड झाले. या कारवाईत कारागृह अधीक्षक, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांपासून पोलीस अंमलदार सहभागी आहेत. त्यामुळे पोलीस दलातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी पोलीस आयुक्तांना नवा उतारा शोधावा लागेल. ही परिस्थिती मुंबईप्रमाणेच राज्यात सर्वत्र आहे. या वर्षी अगदी कालच्या रविवारपर्यंत (१० आॅगस्ट) एसीबीने ७२२ सापळे रचले. त्यात एकूण ९७८ आरोपींना अटक झाली. या आरोपींमध्ये ६९० शासकीय अधिकाऱ्यांचा सहभाग आहे, तर १७० अन्य लोकसेवक आणि ११८ खासगी व्यक्ती सहभागी आहेत. या कारवाया प्रमाण मानल्यास महसूल विभाग सर्वाधिक भ्रष्ट असल्याची जाणीव होते. महसूल विभागातल्या भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी एसीबीने या वर्षी २०१ सापळे रचून एकूण २७४ अधिकारी, लोकसेवक आणि खासगी व्यक्तींना अटक केली. त्या खालोखाल पोलीस दलाचा दुसरा क्रमांक लागतो. एसीबीने पोलिसांसाठी १७१ सापळे रचून एकूण २३७ जणांना गजाआड केले. मात्र मागितलेल्या लाचेची रक्कम पाहिल्यास भ्रष्टाचारात पहिला नंबर येतो. महसूल अधिकाऱ्यांनी सुमारे २० तर पोलिसांनी तब्बल ४६ लाखांची लाच आजवर मागितल्याचे स्पष्ट झालेले आहे. पोलीस दलातला भ्रष्टाचार रोखण्यासाठी तत्कालीन आयुक्त रॉनी मेंडोन्सा यांनी आपल्या कार्यकाळात पोलीस ठाण्यातल्या शिपायाने लाच घेतल्यास वरिष्ठ निरीक्षकावर कारवाई होणार, असा कठोर निर्णय घेतला. मेंडोन्सांनंतर मारियांपर्यंत हा आदेश कायम आहे. त्यानुसार काही प्रकरणांमध्ये कारवाईही झाली. मात्र असे असूनही भ्रष्टाचार थांबलेला नाही. खार येथील कारवाईतून पोलिसांची मानसिकता स्पष्ट होऊ शकते. खार ठाण्याचे एपीआय सुभाष सामंत, पोलीस निरीक्षक नेर्लेकर यांनी एका इस्टेट एजंटला गँगरेपच्या खोट्या केसमध्ये गुंतवू, अशी धमकी देऊन ५० लाखांच्या लाचेची मागणी केली. त्यापैकी काही लाखांचा पहिला हप्ता मागितला. सामंत यांच्या घरी एजंटला बोलावले. तेथे एसीबीने सापळा रचल्याचे लक्षात येताच सामंत लाचेची रक्कम (२० हजार) घेऊन पहिल्या मजल्यावरून उडी मारून पसार झाला. अद्याप सामंतचा शोध लागलेला नाही.