शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

ना कर, ना कर्जमाफी !

By admin | Updated: March 19, 2017 05:50 IST

शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आणि जनतेवर नवे कर नाही, असा शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासाची ‘हमी’ देणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत

मुंबई : शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही आणि जनतेवर नवे कर नाही, असा शेतकऱ्यांसाठी शाश्वत विकासाची ‘हमी’ देणारा अर्थसंकल्प वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत शनिवारी मांडला. उद्योग, पायाभूत सुविधांच्या जोरावर महाराष्ट्राचा अर्थगाडा पुढील वर्षी १० टक्क्यांपेक्षाही अधिक गतीने धावेल, असा आशावादही त्यांनी राज्यातील जनतेपुढे ठेवला. अर्थसंकल्प मांडू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेणारी शिवसेना ऐनवेळी मवाळ झालेली दिसली. शिवसेनेचेच अर्थ राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत अर्थसंकल्प मांडला. या वेळी कर्जमाफीची मागणी लावून धरत टाळ नादावर विरोधकांनी घोषणाबाजीने दोन्ही सभागृहे दणाणून सोडली.

- 62,844कोटींची तरतूद विविध योजनांसाठी करताना अर्थमंत्र्यांनी ४,५११ कोटींची महसुली तूट वाढवून ठेवली आहे.- राज्याच्या महसुली उत्पन्नात भर घालण्यासाठी ३९६ कोटींची करवाढ प्रस्तावित केली आहे. - यंदापासून अर्थसंकल्पीय कामकाजाच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आला असून योजनेतर आणि योजनांतर्गत खर्चाचे एकत्रीकरण करण्यात आले आहे. अशा प्रकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प आहे. - 710 कोटी रुपये मुंबई प्रकल्पांसाठी - मेट्रो रेल्वे लाइन-३ कुलाबा-वांद्रे-सीप्झ मेट्रो मार्गाचे काम प्रगतिपथावर असून मुंबई मेट्रो -२ अ, दहिस ते डीएन नगर आणि मुंबई मेट्रो रेल्वे लाइन - ७ दहिसर ते अंधेरी यांच्या कामांसह पुणे व नागपूर प्रकल्पासाठी तरतूद 1605 कोटी रुपये

- राज्यात स्वच्छ भारत अभियान राबविण्यासाठी 2384कोटी रुपये ओबीसी विकास मंत्रालयासाठी 93.8 कोटी रुपये सेवाग्राम विकास आराखड्यासाठी

- प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्र राज्यात उभारणार- अनुसूचित जातीच्या लोकसंख्येच्या प्रमाणात या विभागाला ७,२३१ कोटींची तरतूद करण्यात आली असून त्यापैकी २,७00 कोटी जिल्हा योजनांसाठी तर ४,५३१ कोटी राज्यस्तरीय योजनांसाठी देण्यात आले. आरोग्य सेवेसाठी १२७.४५ कोटी, रमाई घरकुल योजनेसाठी ६00 कोटी, वसतिगृहांसाठी ३३0.३0 कोटी, निवासी शाळांसाठी २0१ कोटींचा त्यात समावेश आहे.- 25 कोटी रुपये मुंबई विद्यापीठाला १६0 वर्षे पूर्ण होत आहेत. येथील अर्थशास्त्र विभागाचे ‘मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था’ असे नामकरण करण्यात येणार असून या वर्षीपासून पुढील पाच वर्षे याकरिता २५ कोटी रुपये निधी दिला जाणार-----------------------------------कृषी विकासाला चालना ... यंदाचा अर्थसंकल्प हा शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी कृषी क्षेत्रात आवश्यक असणाऱ्या भरीव गुंतवणुकीची तरतूद करणारा असून तो राज्याच्या प्रगतीशीलतेबरोबरच शाश्वत कृषी विकासाला चालना देणारा आहे. राज्यातील कृषी क्षेत्र हे मदत व पुनर्वसनाकडून गुंतवणुकीकडे नेण्याच्या आमच्या धोरणाचे यंदाचा अर्थसंकल्प हा प्रतीक आहे. शेती आणि शेतकऱ्यांचा विचार करणारा अर्थसंकल्प मांडल्यामुळे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे अभिनंदन. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री