शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रामाणिकतेशी तडजोड करू नका!

By admin | Updated: August 27, 2015 02:01 IST

अधिकाऱ्यांच्या मनात ‘मी सरकारी सेवक आहे’ ही भावना येणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, ही भावना ठेवून काम करा. स्वत:बद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करा.

एन. गोपालस्वामी : यूपीएससीतील यशवंतांचा गौरव

पुणे : अधिकाऱ्यांच्या मनात ‘मी सरकारी सेवक आहे’ ही भावना येणे अत्यंत चुकीचे आहे. तुम्ही जनतेचे सेवक आहात, ही भावना ठेवून काम करा. स्वत:बद्दल लोकांच्या मनात आदर निर्माण करा. त्यासाठी प्रामाणिकतेशी तडजोड करू नका, असे आवाहन माजी निवडणूक आयुक्त एन. गोपालस्वामी यांनी यशवंतांना केले.एमआयटी सिव्हिल सर्व्हिसेस ट्रेनिंग इन्स्टिट्यूट व ‘लोकमत’च्या वतीने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) २०१४मध्ये झालेल्या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या देशभरातील गुणवंतांचा गौरव बुधवारी करण्यात आला, त्या वेळी ते बोलत होते. या परीक्षेत प्रथम आलेली इरा सिंघल, द्वितीय रेणू राज आणि तृतीय निधी गुप्ता यांच्यासह विविध यशवंतांचा सत्कार करण्यात आला. या वेळी माजी लष्करप्रमुख जनरल व्ही. पी. मलिक, खासदार डॉ. तरुण विजय, ‘लोकमत’चे संपादक विजय बाविस्कर, माईर्स एमआयटीचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड, एमआयटी स्कूल आॅफ गव्हर्नमेंटचे संस्थापक अधिष्ठाता प्रा. राहुल कराड, एमआयटी स्कूल आॅफ बिझनेसचे संचालक ग्रुप कॅप्टन (निवृत्त) डी. पी. आपटे, ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे प्रमुख एस. बी. धर्मपात्रे आदी उपस्थित होते. गोपालस्वामी म्हणाले, लोकप्रतिनिधींना समस्यांची जाणीव असते. त्याचा फायदा घेऊन अधिकाऱ्यांनी प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करायला हवा. (प्रतिनिधी)‘लोकमत’ व एमआयटीचा उपक्रम कौतुकास्पदयूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्यासाठी या परीक्षेतील टॉपरना एकत्रित आणण्याचा ‘लोकमत’ व एमआयटीचा हा उपक्रम कौतुकास्पद आहे, अशी भावना इरा सिंघल, डॉ. रेणू राज व निधी गुप्ता यांनी या वेळी व्यक्त केली. पंतप्रधान साहाय्यता निधीला ५१ हजार रुपये गौरव सोहळ्यादरम्यान देण्यात आलेली ५१ हजार रुपयांची रक्कम इरा सिंघल यांनी पंतप्रधान साहाय्यता निधीला देण्याचे या वेळी जाहीर केले. लष्कर व प्रशासनात संवाद हवालष्कर आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी एकमेकांच्या कामाची पद्धत, त्याचे महत्त्व जाणून घेणे आवश्यक आहे. युद्ध किंवा इतर महत्त्वाच्या घटनांमध्ये लष्कर व प्रशासन यांनी एकत्र येऊन काम केल्यास ते खूप परिणामकारक ठरेल; पण सध्या असे होत नाही, अशी खंत व्ही. पी. मलिक यांनी व्यक्त केली.देशात काही लोकांकडे खूप पैसा आहे, तर दुसरीकडे गरिबी ही मोठी समस्या आहे. हा विरोधाभास दूर व्हायला हवा. त्यासाठी अधिकाऱ्यांनी कुणापुढेही न झुकता प्रामाणिकपणे लोकांच्या अडचणी सोडवायला हव्यात.- डॉ. तरुण विजय, खासदार भारताची संस्कृती ज्ञानाची आहे. ती टिकविण्याची जबाबदारी तरुणांची आहे. भारत हा एकविसाव्या शतकात जगाचे नेतृत्व करेल, असे विवेकानंद यांनी म्हटले आहे. ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे.- डॉ. विश्वनाथ कराड