शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप घृणास्पद, मी आता सहन करू शकत नाही"; ट्रम्प यांच्या निर्णयावर इलॉन मस्क संतापले
2
काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू
3
अमेरिका-चीनचं भांडण भारताच्या उंबरठ्यापर्यंत; जपान-जर्मनीही त्रस्त, कंपन्यांना टाळं ठोकण्याची वेळ
4
Sana Yousaf : "फ्रेंडशिप, रिजेक्शन आणि मर्डर कनेक्शन"; पाकिस्तानी टिकटॉकर सना युसूफची का झाली हत्या?
5
घणसोली बस आगारात अग्नितांडव; नवी मुंबई पालिकेच्या तीन बस जळून खाक, आगीचे कारण अस्पष्ट
6
"आई, हे मला जंगलात..."; हनिमूनला बेपत्ता झालेल्या कपलचा शेवटचा कॉल, सासूला काय सांगितलं?
7
कोण आहे देशातील सर्वात महागडं घर खरेदी करणारी महिला? ६३९ कोटी किंमत; ६४ कोटींची स्टँप ड्युटीच भरली
8
नात्याला काळीमा! हुंड्यासाठी पती झाला हैवान; AC न मिळाल्याने पत्नीला दिला ट्रिपल तलाक
9
आजचे राशीभविष्य: ०४ जून २०२५; जलाशया पासून दूर राहा, घरातील सर्वांचे सहकार्य मिळेल
10
"१८ वर्षांनंतर स्वप्न पूर्ण झाले"; RCB च्या विजयावर मल्ल्या म्हणाला, "माझी इच्छा पूर्ण करणाऱ्या..."
11
Ashok Saraf Birthday: अशोक सराफ यांना 'मामा' का म्हणतात? म्हणाले होते- "एकदा सिनेमाचं शूटिंग करताना..."
12
आर्टिफिशल इंटेलिजन्स, मशिन लर्निंग या क्षेत्रामध्ये वरिष्ठ पदांवर अनुभवी कर्मचाऱ्यांना मागणी
13
नवा नियम! आता मतदार झालात तरीही स्थानिक स्वराज्य संस्थेत नसेल मतदानाचा हक्क!
14
महापूर, भूकंप, वादळापासून स्वत:चं घर वाचवायचंय? 'प्रॉपर्टी इन्शुरन्स' हाच सर्वोत्तम फॉर्म्युला
15
पाकिस्तानचे नवे रडगाणे; म्हणे- भारताने जास्त हल्ले केले अन् दाखवताना कमी दाखवले
16
पूर्ण वेळ देणाऱ्याला महिला आयोगाची धुरा द्या; मविआ महिला नेत्यांनी घेतली राज्यपालांची भेट
17
म्हाडाच्या अतिधोकादायक इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांना २० हजार भाडे देण्याचा निर्णय
18
हॉटेल व्यावसायिकाला गंडा; ED कडून मध्य प्रदेशातील भाजप आमदाराचा मेहूणा अखेर अटकेत
19
पाकचे ४८ तासांचे नियोजन भारताने ८ तासांतच उधळले- चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ अनिल चौहान
20
धारावी पुनर्विकास प्रकल्प: कुर्ला जमीन हस्तांतरणाच्या अटींत बदल; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

सेनेच्या धमक्यांना भीक घालत नाही

By admin | Updated: November 1, 2015 00:24 IST

भाजपा-शिवसेनेत पडलेली मतभेदांची दरी वाढत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला तडीपार करण्याच्या दिलेल्या धमकीला आम्ही घाबरत नाही, अशा शब्दांत भाजपाचे

नागपूर : भाजपा-शिवसेनेत पडलेली मतभेदांची दरी वाढत असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारला तडीपार करण्याच्या दिलेल्या धमकीला आम्ही घाबरत नाही, अशा शब्दांत भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांनी शनिवारी शिवसेनेला ठणकावले.कुणी कुणाला तडीपार करू शकत नाही. तडीपार मतदारच करतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठणकावून सांगितलेले सेनेनेही ऐकले असेलच. शिवसेनेकडून सातत्याने होत असलेली टीका भाजपा यापुढे तेवढ्याच गांभीर्याने घेईल, असे संकेत दानवे यांनी राज्य सरकारच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित लोकसंवाद मेळाव्यात दिले.पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, राज्यात भाजपाचे सरकार आहे. शिवसेनेचे सरकारला समर्थन आहे. मंत्रिमंडळात भाजपसोबत शिवसेनेचेही मंत्री आहेत. त्यामुळे शिवसेनेने टीका करणे गैर असून भविष्यात त्यांनी टीका करणे टाळावे. उद्धव ठाकरे यांनी मंत्र्यांच्या राजीनाम्याचा इशारा दिला. हे नाटक आहे. मंत्रिमंडळात एकत्रित निर्णय घेतले जातात. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आजवर शिवसेनेच्या एकाही मंत्र्याने विरोध केला नाही. भाजपा- शिवसेनेची युती निवडणुकीनंतर झाली आहे. सत्तेबाहेरील काही विषयांवर भाजपा- सेनेत मतभेद आहेत. दोन्ही पक्षांत समन्वय साधण्यासाठी एक समिती यापूर्वीच स्थापन करण्यात आली आहे. येत्या काळात समितीच्या बैठका होतील, असे स्पष्ट करीत सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. (प्रतिनिधी)मान-सन्मान राहिला कुठे ?शिवसेनेकडून सातत्याने होत असलेल्या टीकेवर दानवे म्हणाले, ‘मान-सन्मान दोन्ही बाजूंकडून व्हायला हवा. शिवसेना ज्या पद्धतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका करीत आहे, हे पाहता मान-सन्मान राहिला कुठे?’ असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.