शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

रिअ‍ॅलिटी शोमधून 'एसएमएस' ची भीक मागू नका !

By admin | Updated: January 2, 2017 20:57 IST

युवक कलावंत गुणी आहेत. त्यांनी खूप परिश्रम घेतले पाहिजेत. रिअ‍ॅलिटी शोंमध्ये जाऊन 'एसएमएस'ची भीक तर नक्कीच मागू नये.

 रवींद्र देशमुख/ ऑनलाइन लोकमत सोलापूर, दि. 2 -  युवक कलावंत गुणी आहेत. त्यांनी खूप परिश्रम घेतले पाहिजेत. थोडशा यशावर हुरळून जाऊन प्रसिध्दीच्या मागे लागू नये. रिअ‍ॅलिटी शोंमध्ये जाऊन 'एसएमएस'ची भीक तर नक्कीच मागू नये. जे मागायचे ते देवी सरस्वतीकडे मागावे, असे आवाहन किराना घराण्याचे विख्यात शास्त्रीय संगीत गायक पं. अजय पोहनकर यांनी ह्यलोकमतह्णशी बोलताना केले.पं. पोहनकर यांची श्रीक्षेत्र गाणगापूर येथे संगीत सेवा होती. त्यानिमित्त ते येथे आले आहेत. कुंभारी येथे डॉ. वासुदेव रायते यांच्या निवासस्थानी पोहनकर मुक्कामाला आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून ह्यलोकमतह्ण आणि दर्डा परिवाराशी असलेल्या स्नेहाचा उल्लेख करून त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, नवीन पिढी खूप हुशार आहे. त्यांना शास्त्रीय संगीत आवडते; पण या संगीताकडे अधिकाधिक युवा रसिकांना आकर्षित करण्यासाठी राग संगीत रटाळ करायला नको. जुनं ते सोनं असतं, हे खरं आहे; पण जुनाट ते कधीच सोनं असू शकत नाही. आजच्या पिढीतील युवा कलावंतांनी शास्त्रीय संगीतात मोठे यश मिळविलेले आहे. अजय पोहनकर हा ह्यक्लासिकल की बोर्डह्ण चा जागतिक दर्जाचा कलावंत आहे. सतारवर निलाद्रीकुमार लोकप्रिय झालेली आहे. उस्ताद अमजद अलींची दोन्ही मुले सरोदचे जागतिक दर्जाचे कलावंत आहेत. कौशिकी चक्रवर्ती उत्तम गायिका आहे, असा उल्लेख त्यांनी आवर्जुन केला.राग संगीत का शिकायचे? या प्रश्नावर ते म्हणाले, जोपर्यंत शास्त्रीय संगीत माहिती नसते, तोपर्यंत अन्य संगीतावर हुकमत मिळविता येणार नाही. त्यामुळे ज्यांना संगीतामध्ये करिअर करायचे आहे किंवा संगीत कला आत्मसात करायची आहे, त्यांनी राग संगीत शिकलेच पाहिजे. मी माझ्या आईकडून डॉ. सुशीलाबाई पोहनकर यांच्याकडून राग संगीत शिकलो. मातोश्री जबलपूर विद्यापीठात संगीत विभागाच्या प्रमुख होत्या. त्या किराणा घराण्याच्या गायिका होत्या. वडील वकिल होते. त्यांना संगीताची आवड होती.युवा कलावंत हल्ली रिअ‍ॅलिटी शोमध्ये रमलेले दिसतात. त्यांनी तेथे आपला वेळ घालवू नये. त्यापेक्षा रियाज करावा. या शोज्मधून उगीचच ह्यएसएमएसह्णची भीक मागू नका. त्यापेक्षा संगीत आत्मसात होण्यासाठी सरस्वती मातेकडे भरपूर मागा, असे आवाहन पं. पोहनकरांनी केले. सोलापूरसारख्या शहरात शास्त्रीय संगीताच्या मैफिली होतात, याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.पं. पोहनकरांना राष्ट्रीय पुरस्कारपं. अजय पोहनकर यांना नुकताच डॉ. गंगूबाई हंगल राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. हुबळी येथे ८ जानेवारी रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे. १ लाख रूपये आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पं. पोहनकर यांनी आनंद व्यक्त केला.