शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

असा न व्हावा ‘दहावा’ कधी..

By admin | Updated: August 9, 2014 23:17 IST

माळीण दुर्घटनेत 151 जण दगावले. या सर्व मृतांचा सामूहिक दशक्रिया विधी रविवारी (दि. 1क्) माळीण फाटय़ावर होणार आहे.

 हुंदका अन् आक्रोश : माळीण फाटा येथे आज 151 मृतांचा सामुहिक दशक्रिया विधी

 
घोडेगाव : माळीण दुर्घटनेत 151  जण दगावले. या सर्व मृतांचा सामूहिक दशक्रिया विधी रविवारी (दि. 1क्) माळीण फाटय़ावर होणार आहे. एकाच वेळी एवढय़ा मृतांचा दशक्रिया विधी होण्याची बहुतेक ही पहिलीच वेळ असेल. विधीसाठी या सर्वाचे एकच पिंड बनविले जाणार असून, या कार्यक्रमास सुमारे 8 ते 1क् हजार लोक येतील असा अंदाज आहे. 
3क् जुलै रोजी माळीण दुर्घटना घडली. तेव्हा आठ दिवस मदतकार्य सुरू होते. या दुर्घटनेत 151 लोक मृत्युमुखी पडले. जेव्हा शेवटचा मृतदेह बाहेर निघेल व हे मदतकार्य थांबेल तेव्हा दशक्रिया विधीची तारीख ठरवू, असा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता. त्यानुसार बुधवारी (दि. 6) मदतकार्य पूर्ण झाले व ग्रामस्थांनीच दि. 1क् रोजी सामूहिक दश्क्रिया विधी करण्याचा निर्णय घेतला. या कार्यक्रमाचे नियोजन भीमाशंकर सहकारी साखर कारखाना व प्रशासनाचे सर्वच विभाग करत आहेत.  
माळीण गावातील शाळेपासून दशक्रियेसाठी नागरिक निघतील व माळीण फाटय़ावर दशक्रिया विधी होईल. या वेळी डिंभे येथील वैभवमहाराज राक्षे यांचे प्रवचन होणार असून, सर्व मृतांचे एकच पिंड बनवून दशक्रिया विधी होणार आहे. यासाठी आवश्यक सर्व विधिवत धार्मिक विधी होणार असल्याचेपांडुरंगमहाराज येवले यांनी सांगितले आहे.  दशक्रिया विधीला मोठय़ा संख्येने जनसमुदाय जमणार हे पाहून माळीण फाटय़ाकडे येण्यासाठी डिंभे ते अडिवरे व तळेघर ते माळीण फाटा असे दोन रस्ते तयार करण्यात आले आहेत. या कार्यक्रमासाठी येणा:या लोकांना डिंभे ते अडिवरे या रस्त्याने येथे पोहचता येईल व जाताना तळेघर मार्गे सोडले जाणार आहे. दशक्रिया विधीला येण्यासाठी कोणालाही अडवले जाणार नाही. वाहनतळामध्येच गाडय़ा लावाव्यात, रस्त्याच्या कडेला गाडय़ा लावू नयेत. डिंभे ते अडिवरे हा रस्ता अरुंद असल्यामुळे वाहतूककोंडी होते. येणा:या लोकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन सहायक पोलीस निरीक्षक गिरीश दिघावकर यांनी 
केले आहे.   (वार्ताहर)
 
4दशक्रिया विधीसाठी जागा मोठी घेण्यात आली आहे. तसेच, वाहनतळ बनविण्यात आले असून, वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. दशक्रिया विधीसाठीच्या जेवणात कोणताही गोड पदार्थ न करता वरण भात व भाजी असे साधे जेवण ठेवण्यात आले आहे. एवढय़ा मोठय़ा समुदायाची जेवणाची व्यवस्था व्हावी यासाठी आमडे रोड, आसाणो रोड, माळीण फाटा अशा तीन ठिकाणी मोठे मांडव घालून यामध्ये जेवण ठेवण्यात आले आहे. 
 
4डिंभे ते अडिवरे हा रस्ता खूप खराब झाला होता. याचेही खड्डे भरण्यात आले आहेत. तसेच तळेघर, कुशिरे मार्गे माळीण फाटा हा रस्ताही अनेक ठिकाणी खचला होता.  त्याचीही दुरुस्ती करण्याचे काम सार्वजनिक बांधकाम खात्याने केले आहे. 
4माळीण गावातील शाळेपासून दशक्रियेसाठी नागरिक निघतील व माळीण फाटय़ावर दशक्रिया विधी होईल.