शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

सर्व दुकानांवर सरसकट बंदी घालू नका

By admin | Updated: June 13, 2017 01:32 IST

राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात असलेल्या सर्व दारूविक्री दुकानांवर सरसकट बंदी घातली जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रत्येक

- लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात असलेल्या सर्व दारूविक्री दुकानांवर सरसकट बंदी घातली जाऊ शकत नाही, असे म्हणत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला प्रत्येक दुकान मालकाचे म्हणणे ऐकून योग्य ते आदेश देण्यास सांगितले.दारूविक्री न करण्याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाने बजावलेल्या नोटीसना काही दारूविक्री दुकानांनी, परमिट रूम व बार मालकांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. या याचिकांवरील सुनावणी शंतनू केमकर व एम. एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात असलेली सर्व दारूविक्रीची दुकाने बंद करण्याचा आदेश डिसेंबर २०१६ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सर्व राज्यांना दिला. या आदेशाचे पालन करत राज्य सरकारने काही बार, परमिट रूम व दारूविक्री करणाऱ्या दुकानांना नोटीस बजावली.याचिकाकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची दुकाने राष्ट्रीय किंवा राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात नाहीत. मात्र ‘दुकान राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात येत आहे की नाही, हे न पाहताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित दुकानांना सरसकट नोटीस बजावली आहे, असे आम्हाला वाटते. प्रत्येक केसचा (दारूविक्री करणारी दुकाने) विचार करूनच योग्य आदेश द्यावा,’ असे म्हणत न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) सचिवांसह उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्तांना सर्वांच्या तक्रारी ५ जुलैपर्यंत ऐकून योग्य आदेश देण्याचे निर्देश दिले.राज्य सरकारने बजावलेल्या नोटीसना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला. दुकान मालकांची बाजू न ऐकताच नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. तर महामार्गांसंबंधी कोणतीही अधिसूचना सरकारी दफ्तरी नसल्याने सरकारवर ओढावलेल्या लाजिरवाण्या स्थितीवर सारवासारव करताना महाअधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी राज्य सरकारला अशा प्रकारची अधिसूचना सादर करण्याची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाला सांगितले. ‘शहरातील जे रस्ते महामार्गाला जोडले जातात, त्याही रस्त्यांवरील दुकानांवर कारवाई करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने आदेशात म्हटले आहे,’ असा युक्तिवाद कुंभकोणी यांनी केला.स्थगिती देण्यास नकारदुकान राज्य महामार्गाच्या ५०० मीटर अंतरात येत आहे की नाही, हे न पाहताच राज्य उत्पादन शुल्क विभागाने संबंधित दुकानांना सरसकट नोटीस बजावली आहे, असे आम्हाला वाटते. दुकान मालकांची बाजू न ऐकताच नोटीस बजावण्यात आल्या आहेत, असे निरीक्षण नोंदवत राज्य सरकारने बजावलेल्या नोटीसना स्थगिती देण्यास न्यायालयाने नकार दिला.