शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

डीसीसी घोटाळ्यातील आरोपींना नोटीस दिल्याशिवाय अटक करू नका

By admin | Updated: July 15, 2016 20:49 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात आरोपी असलेल्या माजी संचालकांना अटक करण्यापूर्वी ७२ तास आधी तशा आशयाची नोटीस पाठवावी, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची

ऑनलाइन लोकमतबीड, दि. १५ -  जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रकरणात आरोपी असलेल्या माजी संचालकांना अटक करण्यापूर्वी ७२ तास आधी तशा आशयाची नोटीस पाठवावी, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करण्याची संधी त्यांना मिळावी, असे स्पष्ट आदेश जिल्हा न्यायालयाचे सत्र न्यायाधीश पानसरे यांनी पोलिसांना शुक्रवारी दिले.अंबाजोगाई तालुक्यातील आंबा सहकारी सहकार साखर कारखाना बेकादेशीर  कर्ज प्रकरणातील आरोपी पांडुरंग विठ्ठल गाडे यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. यावेळी न्यायालयाने विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) अधिकाऱ्यांना याबाबत विचारणा केली. त्यावेळी सरकारी वकील अजय राख यांनी डीसीसी घोटाळा १४१ कोटींचा असल्याचे सांगत अटक  करावी अशी मागणी केली तर एसआयटी अधिकाऱ्यांनी न्यायालयाला आपली बाजू मांडताना सांगितले की, कोणत्याही आरोपीच्या पोलीस कोठडीची आवश्यकता नाही; मात्र माजी संचालक बँक तपासातील कागदपत्रे मिळण्यास अडथळा निर्माण करतील, तसेच घोटाळ्यातील आरोपींनी आपली संपत्तीचा अहवाल दिला नसल्याचे सांगितले. ही बाब न्यायालयाने अधोरेखित करीत डीसीसी घोटाळ्यातील आरोपींना ७२ तासांपूर्वी अटकेसंदर्भात नोटिस दिल्याशिवाय अटक करू नका, असे आदेश दिले. त्यांनाही न्यायालयीन प्रक्रिया अर्थात जामिनासाठी अर्ज करण्याची मुभा यामुळे मिळाली आहे. तूर्त या प्रकरणातील सर्व आरोपींना आता दिलासा मिळाला आहे. एसआयटीच्या वतीने अपर पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम, उप अधीक्षक राजकुमार चाफेकर, पो.नि. विद्यानंद काळे यावेळी न्यायालयात उपस्थित होते. आरोपी गाडे यांच्या वतीने अ‍ॅड. बाळासाहेब कोल्हे यांनी बाजू मांडली.