शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

मतांच्या मागे लागू नका, लोकांची मनं जिंका - राज ठाकरे

By admin | Updated: November 22, 2014 12:02 IST

लोकांच्या जवळ जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणे राजकारणात महत्वाचे असते असं सांगत मतांच्या मागे पळण्यापेक्षा लोकांची मनं जिंका असा सल्ला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिला.

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २२ - राजकारणात फक्त निवडणूक महत्वाची नसते लोकांच्या जवळ जाऊन त्यांचे प्रश्न सोडवणेही महत्वाचे असते असं सांगत मतांच्या मागे पळण्यापेक्षा लोकांची मनं जिंका असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिला. पुण्यातील मनसे पदाधिका-यांच्या मेळाव्यात बोलताना त्यांनी कार्यकर्त्यांची शाळा घेतली. लोकं तुमच्यापासून दूर गेली नाही तर तुम्हीच त्यांच्यात मिसळला नाहीत असे सांगत त्यांनी विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे विश्लेषण केले व कार्यकर्त्यांची कानउघडणी केली. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना काही मोलाचे सल्लेही दिले. 
पक्षाने आखून दिलेल्या चौकटीच्या बाहेर गेलात तर पक्षाच्या बाहेर जाल असे सांगत पक्षात बेशिस्त अजिबात खपवून घेतली जाणार नाही असा इशारा त्यांनी दिला. प्रत्येक वेळेसआंदोलनं, मारहाणं करूनच कामं होत नाहीत, लोकांशी चांगले संबंद प्रस्थापित करू, माणुसकीने वागूनही कामं करून घेतात येताता असा सल्ला त्यांनी दिला.
तसेच कार्यकर्त्यांच्या होर्डिंगबाजीवरही त्यांनी नाराजी वर्तवली. होर्डिंग लावून कोणीही मोठा अथवा महान होत नसतो. यापुढे महाराष्ट्रात एकाही पदाधिका-याच्या वाढदिवसानिमित्त होर्डिंग लागलेले दिसले तर दुस-या दिवसापासून तो पदावर राहिलेला दिसणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 
राजकारण म्हणजे समाजकारण असतते. फक्त रक्तदान शिबीरं, फळं आणि वह्या वाटप करत बसू नका तर लोकांच्या दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवा. त्यांना काय हवयं ते विचारा, असं काम करा की तुम्ही त्यांच्या कायम लक्षात रहाल. 
पक्षातील कोणालाही कसलीही तक्रार अथवा सूचना करायची असेल, काही नवीन कार्यक्रम राबवायचे असतील तर connectrajthackeray@gmail.com या आयडीवरून माझ्याशी संपर्क साधून माहिती पाठवा असेही त्यांनी सांगितले.