शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालये खरेच न्याय देतात का ?- अॅड. उज्ज्वल निकम

By admin | Updated: June 12, 2016 22:00 IST

डान्स बारमुळे पुन्हा अनेकांचे संसार देशोधडीला लागणार आहेत. अशा परिस्थितीत न्यायालये खरेच समाजाला न्याय देतात का?

मिलिंदकुमार साळवे

अहमदनगर, दि. 12 - डान्स बारमुळे अनेकांचे संसार देशोधडीला लागतात म्हणूनच महाराष्ट्र सरकारने समाजाच्या हितासाठी डान्स बारबंदीचा कायदा केला. पण सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारचा कायदा रद्द ठरवून तरुणांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या डान्स बारला परवानगी देण्याचा आदेश दिला. डान्स बारमुळे पुन्हा अनेकांचे संसार देशोधडीला लागणार आहेत. अशा परिस्थितीत न्यायालये खरेच समाजाला न्याय देतात का? असा खडा सवाल यावर्षी भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलेले विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनीच विचारला आहे.

नगरमधल्या टाकळीभान येथे श्रीरामपूर तालुका शेतकरी खरेदी विक्री संघाचे सभापती दीपक पटारे आणि माऊली प्रतिष्ठानच्या वतीने अहमदनगर जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या ११७ विधवांना मोफत शिलाई मशिनचे वाटप निकम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे अध्यक्षस्थानी होते.

(डान्स बारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारलं)

"आज राज्यात शेतकरी आत्महत्या करताहेत. वैफल्यातून कुविचार येतो. डान्स बारमध्ये पैसे उधळून सांगली, सातारा, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांच्या मुलांचे जीवन उद्ध्वस्त झाले. इतरांच्याही संसाराची राखरांगोळी झाली. त्यातूनच राज्य सरकारने डान्स बार बंदीचा कायदा केला. पण तो सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. प्रत्येकाला धंदा करायचा अधिकार आहे, असे म्हणत न्यायालयाने पुन्हा डान्स बारला परवानगी दिली. समाजहितासाठी केलेला कायदा रद्द करणारी न्यायालये खरेच न्याय देतात का?," असं वक्तव्य सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी केलं आहे.

 

"कायदा हा समाजहितासाठी असतो. सरकारने यासाठी ठामपणे भूमिका घेतली पाहिजे. त्यानुसार महाराष्ट्र सरकारने नव्याने हा कायदा करायची भूमिका घेतली. विजय मल्ल्यासारखे लोक अब्जावधींचे कर्ज घेऊन देशाबाहेर पळून जातात. पण सरकार त्यांचे काही करू शकत नाही. तर हजार रुपयांच्या कर्जासाठी बँकांच्या तगाद्याला कंटाळून शेतकऱ्याच्या गळ्याला फास बसतो. या परिस्थितीत सरकारने कर्जांबाबत सर्वांगीण विचार करण्याची गरज आहे, "  असे मत मांडत निकम यांनी या कार्यक्रमातून सरकार व न्यायालयाचे कान टोचत शेतकऱ्यांची बाजू घेतली आहे.