शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याकडून काही चुका झाल्या असतील तर..."; भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचं भावूक पत्र
2
'तरुणी हव्या आहेत, घसघशीत कमिशन मिळेल'; युपी-बिहार सोडून केरळमध्ये रचला जातोय भारताविरोधात मोठा कट
3
संजय राऊतांनी लिहिलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पत्र; अजितदादांच्या आमदारावर गंभीर आरोप
4
HDB Financial IPO Listing: एचडीएफसीच्या 'स्टार'ची बंपर एन्ट्री; लिस्टिंगवर पैशांचा पाऊस, गुंतवणूकदार मालामाल
5
ट्रम्प यांचे मोठे वक्तव्य; लवकरच भारतासोबत होणार व्यापार करार, किती टक्के शुल्क लादणार?
6
पहलगाम हल्ल्याबाबत क्वाडच्या बैठकीत झाला मोठा निर्णय, भारताचा अमेरिकेतून पाकिस्तानला धक्का 
7
पाठीमागून आला लाथ मारली, नंतर गर्लफ्रेंडचा चिरला गळा, तरुणाने वडिलांसमोरच घेतला जीव, का केली हत्या?
8
Stock Market Today: ९३ अंकांच्या तेजीसह खुला झाला सेन्सेक्स; बँक निफ्टीत विक्रमी तेजी
9
तरुणांनो, तयार राहा, दोन वर्षांत सरकार तुम्हाला देणार तब्बल ३.५ कोटी नोकऱ्या
10
Mumbai: झोपत नाही म्हणून पाच वर्षाच्या मुलीच्या चेहऱ्यावर दिले सिगारेटचे चटके, बापाचं क्रूर कृत्य!
11
FD-RD विसरून जा, हा आहे LIC चा ‘अमृत’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शन संपेल
12
निसर्ग कोपला! एका दिवसात ११ ठिकाणी ढगफुटी, पूर आणि भूस्खलन; हिमाचल प्रदेशात हाहाकार
13
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
14
गोगावलेंवर भाजप आमदार भडकले; विधानभवनात परिसरात झाली शाब्दिक चकमक
15
"माझी डॉक्टर पत्नी पाकिस्तानची गुप्तहेर..."; व्यावसायिक पतीचा खळबळजनक दावा, तपास यंत्रणेकडे तक्रार
16
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
17
Navi Mumbai: धक्कादायक! नवजात बाळाला प्रवाशांकडे सोडून जन्मदात्री गेली पळून, गुन्हा दाखल
18
२० हून अधिक गर्लफ्रेंड, १० जणींसोबत शारीरिक संबंध; पोलिसांच्या जाळ्यात अडकला 'बोगस पोलीस'
19
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
20
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", 'त्या' अभिनेत्रीसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया

गर्भावशेषाच्या डीएनए परीक्षणात अत्याचार सिद्ध

By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST

आत्महत्या केलेल्या पीडित १५ वर्षीय मुलीच्या गर्भ अवशेषाच्या डीएनए परीक्षणात अत्याचार सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या न्यायालयाने एका नराधमाला १० वर्षे सश्रम

आरोपीला १० वर्षे कारावास : पीडित मुलीने केली होती आत्महत्यानागपूर : आत्महत्या केलेल्या पीडित १५ वर्षीय मुलीच्या गर्भ अवशेषाच्या डीएनए परीक्षणात अत्याचार सिद्ध झाल्याने अतिरिक्त सत्र न्यायाधीश सलमान आझमी यांच्या न्यायालयाने एका नराधमाला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. कान्हा हंकर कोवे (२२) असे आरोपीचे नाव असून, तो पारडीच्या गोंड मोहल्ला येथील रहिवासी आहे. पीडित मुलगी ही भांडेवाडी कोष्टीपुरा येथे राहत होती. आई-वडिलांची ताटातूट झाल्यानंतर पीडित मुलगी ही आपल्या आजीसोबत राहत होती. आजी भीक मागून प्रपंच भागवीत होती. कान्हाने नातेसंबंधातील या मुलीसोबत प्रेमसंबंध प्रस्थापित केले होते. या संबंधाआड तो लैंगिक शोषणही करायचा. ती गरोदर होती. काही दिवस संबंध ठेवून अचानक त्याने संबंध तोडले होते. तिच्याशी दगाबाजी केली होती. त्यामुळे वैफल्यग्रस्त होऊन तिने २३ जानेवारी २०१३ रोजी मोहल्ल्यातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मृत मुलीच्या आईने नोंदविलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी भादंविच्या ३०६, ३७६ (२) (एफ)(एच)(एम) आणि लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियम २०१२ च्या कलम ५, ६ अन्वये गुन्हा दाखल करून २४ जानेवारी रोजी आरोपी कान्हा कोवे याला अटक केली होती. पोलीस निरीक्षक व्ही. सोनवणे यांनी तपास करून न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मृत मुलीच्या उत्तरीय तपासणीनंतर तिचे पुरुष जातीचे गर्भावशेष डीएनए परीक्षणासाठी पाठविण्यात आले होते. त्यात मृत मुलगी आणि आरोपी कान्हा हे मृत अर्भकाचे जैविक पालक असल्याचा अहवाल प्राप्त झाला होता. दोन्ही शिक्षा एकत्र न्यायालयात गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला भादंविच्या ३७६ कलमांतर्गत तसेच लैंगिक अत्याचारापासून बालकांचे संरक्षण अधिनियमाच्या कलम ५, ६ अन्वये प्रत्येकी १० वर्षे सश्रम कारावास आणि ४ हजार रुपये दंड सुनावण्यात आला. आरोपीला दोन्ही शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील ज्योती वजानी यांनी काम पाहिले. हेड कॉन्स्टेबल अनिल गजभिये, नायक पोलीस भास्कर बनसोड यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)