शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘डीएमआयसी’ची मदार स्वीडनच्या उद्योगांवर - सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2017 03:57 IST

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी), शेंद्रा आणि आॅरिकमध्ये उद्योग येण्यासाठी स्वीडनमध्ये मार्केटिंग करण्यात आली असून, तेथील ४०० उद्योग सध्या भारतात आहेत.

औरंगाबाद : दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉर (डीएमआयसी), शेंद्रा आणि आॅरिकमध्ये उद्योग येण्यासाठी स्वीडनमध्ये मार्केटिंग करण्यात आली असून, तेथील ४०० उद्योग सध्या भारतात आहेत. त्यांच्याशी गेल्या महिन्यात चर्चा केल्यानंतर आशा पल्लवीत झाल्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी स्पष्ट केले.सीएमआयएच्या देवगिरी इलेक्ट्रॉनिक क्लस्टर प्रा.लि.च्या भूमिपूजनप्रसंगी ते शेंद्रा येथे बोलत होते. उद्योगमंत्री देसाई म्हणाले, देशातील पहिले इलेक्ट्रॉनिक क्लस्टरचे भूमिपूजन येथे होत आहे. येथील इको सिस्टीम, दळणवळण, बाजारपेठ, कुशल मनुष्यबळामुळे जगभरातील कंपन्या औरंगाबादचा विचार करतील. व्हेंडर सिस्टीम चांगली असल्याचे मध्यंतरी स्वीडन दौºयामध्ये तेथील उद्योगांना सांगितले. ई-मोबिलिटीचा पुढचा काळ असणार आहे. इलेक्ट्रॉनिककार उत्पादनाची यापुढीलबाजारपेठ असणार आहे. मुख्यमंत्र्यांसोबत केलेल्या स्वीडन दौºयात मराठवाडा आणि औरंगाबादचे मार्केटिंग केले. यावेळी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, खा.चंद्रकांत खैरे, संजय केसकर, सीएमआयचे अध्यक्ष प्रसाद कोकीळ, क्लस्टरचे संचालक सुरेश तोडकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.स्थानिक उद्योगांवर भर हवाविधानसभा अध्यक्ष बागडे हे सुभाष देसाईंना म्हणाले, येथील औद्योगिक प्लॉट लवकर भरावेत ही अपेक्षा आहे. येथील शेतकºयांनी मोठ्या अपेक्षेने जमिनी दिल्या आहेत. इलेक्ट्रॉनिक सेक्टरमध्ये पाहिजे तेवढी प्रगती इकडे झालेली नाही. बाहेरच्यांऐवजी स्थानिक उद्योगांवर भर दिला जावा. आंध्र प्रदेशात किया मोटार्स हा उद्योग गेला तरी परत आणावा असे साकडे खा.खैरे यांनी उद्योगमंत्री, विधानसभा अध्यक्षांना घातले.बजाजनगरात रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनवाळूज औद्योगिक क्षेत्रात विविध सुविधा पुरविण्यासाठी एमआयडीसीचे प्रयत्न सुरू असून, स्मार्ट औद्योगिक क्षेत्र नावारूपास यावे, यासाठी एमआयडीसीकडून भरीव मदत करण्याचे आश्वासन उद्योगमंत्री देसाई यांनी बजाजनगरात आयोजित कार्यक्रमात दिले.बजाजनगरात २७ कोटींचा निधी खर्च करून नागरी वसाहतीतील रस्त्याचे डांबरीकरण करण्यात येणार असून, या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोमवारी सुभाष देसाई, हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. वाळूज औद्योगिक क्षेत्रातील सर्वात मोठी कामगार वसाहतम्हणून ओळखल्या जाणाºया बजाजनगरात एमआयडीसी प्रशासनाकडून विविध सुविधा पुरविण्यात येतात. आधी जाहीर करण्यात आल्याप्रमाणे आ. प्रशांत बंब, आ. अतुल सावे हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होते; मात्र ते आले नाहीत.

टॅग्स :GovernmentसरकारSubhash Desaiसुभाष देसाई