शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
3
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
4
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
5
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
6
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
7
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
8
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
11
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
12
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
13
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
14
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
15
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
16
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
17
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
18
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजकाचा मृत्यू
19
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
20
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या

‘डीजे’चा फैसला पुढच्या बुधवारी -उच्च न्यायालय

By admin | Updated: June 18, 2015 02:40 IST

सणासुदीला व घरगुती कार्यक्रमांना लावल्या जाणाऱ्या डीजेच्या आवाजाबाबत उच्च न्यायालय पुढच्या बुधवारी सविस्तर आदेश देणार आहे़

मुंबई: सणासुदीला व घरगुती कार्यक्रमांना लावल्या जाणाऱ्या डीजेच्या आवाजाबाबत उच्च न्यायालय पुढच्या बुधवारी सविस्तर आदेश देणार आहे़ त्यामुळे डीजेचा आवाज कमी होणार की बंद होणार का, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे़उत्सवांदरम्यान मोठ्या अवाजात लावण्यात येणाऱ्या लाऊडस्पीकरचा स्थानिकांना त्रास होतो. त्यामुळे याला प्रतिबंंध करावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका ठाण्यातील डॉ़ महेश बेडेकर यांनी दाखल केली आहे़ त्याची दखल घेत न्यायालयाने मार्च २०१५ मध्ये याला प्रतिबंध करणारे धोरण आखण्याचे आदेश राज्य शासनाला दिले होते़ मात्र हे धोरण आखले नसल्याची माहिती बुधवारी न्या़ अभय ओक व न्या़ रेवती मोहिते-ढेरे यांच्या खंडपीठाला याचिकाकर्त्यांनी दिली़ त्यावर संतप्त झालेल्या न्यायालयाने शासनाला चांगलेच धारेवर धरले़ आम्ही उत्सवांच्या विरोधात नाही़ पण नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे़ त्यामुळे कठोर नियम असणे आवश्यकच आहे़ तेव्हा हे धोरण कधी आखले जाणार याचे प्रतिज्ञापत्र सादर करा, असे आदेश खंडपीठाने दिले़ यावेळी डी़जे़ च्या आवाजाचाही नागरिकांना खूप त्रास होत असल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांनी उपस्थित केला़ त्याची दखल घेत न्यायालयाने डी़जे़ मध्ये वापरण्यात येणारे स्पीकर व साधनांची माहिती शासनाने द्यावी, असे आदेश देत याबाबत पुढच्या बुधवारी सविस्तर आदेश दिले जातील असे स्पष्ट केले़ (प्रतिनिधी)