शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीला चायवेलीची भाकर,चवळीची भाजी

By admin | Updated: November 2, 2016 02:53 IST

दारु, ताडी, चायवेलीची भाकर, चवळी, डांगर, बोेंबलाची भाजी खाऊन आनंदात दिवाळी साजरी करीत असतात़.

विक्रमगड : या परिसरातील आदिवासींच्या दिवाळीला लाडु, करंज्या, कडबोळी, शंकरपाळे, चकली यांची जरुरी नसते़ कारण ते दारु, ताडी, चायवेलीची भाकर, चवळी, डांगर, बोेंबलाची भाजी खाऊन आनंदात दिवाळी साजरी करीत असतात़.येथील आदिवासी पारंपारिक व निसर्गाशी एकरुप होउन दिवाळी साजरी करीत असतो़ आपटयाच्या पानाप्रमाणे जोडलेली याच वेलीची पाने आणि झाडांच्या सुकलेल्या फांद्यांचा भारा आदिवासी महिला दिवाळीसाठी जंगलातून आणतात़ आपल्या शेतात पिकविलेले भात उखळातून कांडून आणि सुपातून पाखडून त्यातून तांदुळ काढतात.़ घरातील जात्यावर ते दळून त्याचे पीठ करतात़. शेताच्या बांधावर लावलेल्या काकडीच्या वेलावरची मोठी काकडी घेऊन ती मधोमध उभी कापतात़ नदीतील शिंपल्याने ती खरवडून काकडीचे तुकडे दळलेल्या पिठात मळून घेतात़ चायवेलीच्या पानाच्या आकारा एवढा पिठाचा गोळा घेऊन चायवेलीच्या पानात थापून घेतात़ लाकडे चुलीत पेटवून मोठया पातेल्यात चायवेलीच्या पानावरील भाकरी उकडून घेतल्या जातात़ लालभोपळा(डांगर)कापून, चवळी आणि बोंबील यांची भाजी करतात़ भाजी-भाकरीचा हा पदार्थ दिवाळीत आदिवासींच्या घराघरात तयार केला जातो़दिवाळीत घरातील कुलदेवतेला धुवून आणि पुसून त्यांना शेंदूर लावतात. तेलाचा दिवा पेटवून चायवेलीच्या भाकरी व डांगर, चवळी, बोंबलाच्या भाजीचा नैवेद्य दाखवितात. त्यानंतर देवावर दारुची अथवा ताडीची धार टाकतात. सर्व लहान मोठी माणसे एकमेकांना घास भरवून मिठी मारुन भेट घेतात़भगत हा भक्तांना व गावदेवाला आणि वाघ्या देवाला घेवून मिरवतात़. यावेळी दारु, ताडीची धार चाखून चायवेलीची भाकरी व भाजी देवाला वाहतात. गावातील दु:ख, दैन्य, दारिद्रय व रोगराई घालवून टाक, अशी प्रार्थना करतात़. काही आदिवासी नरक चतुर्दशीपासुन तीन दिवस पारंपारिक पध्दतीने दिवाळी साजरी करतात़ पाडव्याच्या दिवशी गावा-गावातील गुराखी गुरांच्या शिंगाला कुटलेले पीठ लावतात. मुठीच्या सहाय्याने पिठाच्या द्रावणाचे ठसे जनावरांच्या अंगावर उमटवतात़. नंतर वेशीपाशी पालापाचोळा व गवत पेटवून त्या आगीतून जनावरे पळविली जातात. आदिवासी महिला तांदुळ कांडुन ते पाण्यात भिजवतात आणि घराच्या दर्शनी भागावर हाताच्या मुठींनी ठसे उमटवतात़>शेणाचा वा चिबुडाचा दिवाआदिवासी पणती म्हणजे कोडया मिळाला नाही तर शेणाचा दिवा किंवा चिबुड कापून दिवा करतात़ त्यात तेल टाकून तो पेटवितात़ झेंडुच्या फुलांना आदिवासी मखमलीची फुले असे म्हणतात ़ती फुले, लोंगर आणि आंब्याची पाने यांच्या माळा करुन घरच्या दर्शनी भागात लावतात़ गरीब आदिवासीही आपल्या मुलांना दिवाळीत नवीन कपडे घेत असतो़