शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
2
मुंबईत दीड कोटी अमराठी, त्यांच्याशी‌ बोलताना हिंदी हवी की नको; चंद्रकांत पाटील यांचं विधान
3
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
4
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
5
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
6
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
7
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
8
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
9
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
10
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
13
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
14
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
15
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
16
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
19
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
20
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ

दीपालीला फेसबुककडून १ कोटी ४२ लाखांची आॅफर

By admin | Updated: December 4, 2014 02:58 IST

जग जोडणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साइट्सने मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चक्क कोट्यवधी पगाराच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत.

मुंबई : जग जोडणाऱ्या फेसबुकसारख्या सोशल नेटवर्क साइट्सने मुंबई आयआयटीच्या विद्यार्थ्यांना चक्क कोट्यवधी पगाराच्या नोकऱ्या देऊ केल्या आहेत. सोमवारी झालेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये फेसबुकने मुंबई आयआयटीच्या पाच विद्यार्थ्यांची निवड केली आहे. दीपाली अडलखा, वेदरत्न दीक्षित, रोहन दास, आस्था अग्रवाल आणि राहुल सिंघल यांचा यात समावेश आहे. विशेष म्हणजे दीपाली अडलखाला फेसबुकने चक्क १ कोटी ४२ लाखांची नोकरी देऊ केली आहे.आयआयटीकडून मिळालेल्या माहितीनुसार, फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट, बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप, ब्लॅकस्टोन, सॅमसंग, ओरॅकल, लिंक्डइन, मॉर्गन स्टॅन्ले आणि शेलसारख्या नामांकित कंपन्यांनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. पहाटे चार वाजल्यापासून मध्यरात्री दोन वाजेपर्यंत तब्बल ३७ कंपन्यांनी आयआयटीच्या विद्यार्थ्यांमधील टॉपर्सच्या मुलाखती घेतल्या. महत्त्वाचे म्हणजे गेल्या वर्षी पहिल्या दिवशी ४०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती झाल्या होत्या. या वर्षी मुलाखतींचा आकडा तब्बल ५५० वर पोहोचला. विद्यार्थी वर्गाला प्रत्येकी ८० अर्ज करण्याची मर्यादा घालण्यात आली होती. परिणामी प्रत्येक कंपनीकडे दाखल होणाऱ्या अर्जांची संख्या घटली होती. आणि ती ८०० हून ३०० वर आली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेणाऱ्या कंपन्यांमध्ये आंतरराष्ट्रीय कंपन्यांची संख्या अधिक आहे.मुंबई आयआयटीमधून सर्वाधिक रकमेच्या पगाराची नोकरी पटकावणाऱ्या दीपाली अडलखा हिच्याशी संपर्क साधला असता तिने सांगितले की, माझा पगार १ कोटी ४२ लाख असला तरी बेसिक पेमेंट ६५ लाख एवढे आहे. (प्रतिनिधी)