शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

दिवाळीची आतषबाजी बेतली पशू-पक्ष्यांच्या जिवावर, फटाक्यांचा कचरा उघड्यावर टाकू नका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 1:54 AM

दिवाळीमध्ये लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत फटाक्यांचे आकर्षण कमालीचे असते. फटाक्याने काही क्षणांचा आनंद अनुभवायला मिळतो, पण निसर्गाची हानी दीर्घकाळ होते. याकडे कोणी लक्ष देत नाही.

सागर नेवरेकर मुंबई : दिवाळीमध्ये लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत फटाक्यांचे आकर्षण कमालीचे असते. फटाक्याने काही क्षणांचा आनंद अनुभवायला मिळतो, पण निसर्गाची हानी दीर्घकाळ होते. याकडे कोणी लक्ष देत नाही. दरवर्षीप्रमाणे यंदाही मुंंबईकरांचा फटक्यांबाबतचा उत्साह प्राण्यांसह पक्ष्यांच्या जिवावर बेतला असून फटाक्यांमुळे प्राण्यांसह पक्ष्यांना इजा पोहोचली आहे.मुलुंड येथील वीणानगर परिसरात फटाक्यांच्या आवाजामुळे घरट्याबाहेर पडलेली बुलबुल पक्ष्यांची पिल्ले आढळली. सोसायटीच्या आवारातील झाडाझुडपात बुलबुल पक्षाने घरटे बांधले होते. सोसायटीतील लहान मुलांनी फटाके फोडायला सुरुवात केली असता बुलबुल पक्ष्यांची पिल्ले फटाक्याच्या आवाजाने बाहेर आली. या पक्ष्यांच्या जिवाला धोका निर्माण होऊ नये यासाठी प्राणिमित्रांना बोलावण्यात आले. त्यानंतर पिल्लांना घरट्यात सोडण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु प्रयत्न निष्फळ ठरले. तर चेंबूर येथील रोड नंबर ४ वरील सत्यलक्ष्मी सोसायटीमध्ये एक पाय तुटलेली पानकोंबडी आढळली. त्या पानकोंबडीवर त्वरित उपचार करण्यासाठी ठाण्यातील एसपीसीए येथे नेण्यात आले.पवईतभटक्या कुत्र्याच्या शेपटीला फटाक्यामुळे जखम झाली. मुलुंडमध्ये लिंक रोडला अर्धे तोंड जळालेला कुत्रा रस्त्यातून सैरावैरा पळत असल्याचे कळवण्यात आले. परंतु जखमी कुत्रा कोणाच्या दिसण्यात आला नसल्याचे नागरिकांनी सांगितले. प्राण्यांना इजा होते, त्या वेळी ते प्रचंड घाबरलेले असतात. घाबरलेल्या स्थितीत असल्याने कोणाच्या हातात सापडत नाहीत, अशी माहिती प्राणिप्रेमींनी दिली. मुलुंडमधील राहुलनगर येथे जखमी अवस्थेत माकड सापडले. उपचारानंतर दोन दिवसांनी माकडाचा मृत्यू झाला, अशी माहिती रॉ पशू संस्थेचे पशुकल्याण अधिकारी आणि वन्यजीव रक्षक पवन शर्मा यांनी दिली.भांडुपमधून जखमी चिमणी आढळली. लहान मुलांनी चिमणीच्या घरट्यांत फटाका फोडल्याने चिमणीला इजा झाली. तसेच मुलुंडमध्ये घुबड आढळला. घुबडदेखील फटाक्यांच्या आवाजाने घाबरून गेले होते. चिमणी आणि घुबडावर उपचार करून सुटका करण्यात आली.>दिवाळी संपल्यावर काही लोक फटाक्यांचा कचरा उघड्यावर टाकून देतात. उघड्यावर टाकून दिलेले फटाके कुत्रे आणि मांजर यासारखे प्राणी चाटतात. त्या फटाक्यांतील विषारी पदार्थ प्राण्यांच्या पोटात गेल्याने त्यांच्या जिवाला धोका निर्माण होतो. त्यामुळे नागरिकांनी उघड्यावर फटाके किंवा फटाक्यांचा कचरा टाकू नये, असे आवाहन प्राणिमित्रांनी केले आहे.>परळ येथे असणाºया पशुवैद्यकीय रुग्णालयात फटाक्यांमुळे जखमी झालेल्या प्राणी आणि पक्ष्यांना मोठ्या संख्येने दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली़>मुंबईत आढळलेले जखमी प्राणी, पक्षी>पवईमध्ये प्लान्ट अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल वेल्फेअर सोसायटी या संस्थेला पाळीव कुत्रा आढळला आहे. हा कुत्रा काळ्या रंगाचा असून त्याच्या कंबरेत निळ्या रंगाचा पट्टा आहे, अशी माहिती सोसायटीचे सचिव सुनिश कुंजू यांनी दिली.१७ आॅक्टोबरसरपटणारे प्राणी - ०८पक्षी - ००सस्तन प्राणी - ०१एकूण - ०९१८ आॅक्टोबरसरपटणारे प्राणी - ०३पक्षी - ०१सस्तन प्राणी - ००एकूण - ०४१९ आॅक्टोबरसरपटणारे प्राणी - ०४पक्षी - ०२सस्तन प्राणी - ००एकूण - ०६२० आॅक्टोबरसरपटणारे प्राणी - ०४पक्षी - ००सस्तन प्राणी - ००एकूण - ०४