शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांची दिवाळी अंधारात!

By admin | Updated: October 24, 2014 23:26 IST

पश्‍चिम व-हाडातील सोयाबीन उत्पादनात एकरी ७0 टक्के घट.

ब्रम्हानंद जाधव / मेहकर (बुलडाणा)कापसाचा पेरा सातत्याने आतबट्ट्याचा व्यवहार ठरू लागल्यामुळे, गत काही वर्षात कापूस उत्पादक पट्टा ही ओळख मिटवून सोयाबीन उत्पादक पट्टा अशी नवी ओळख निर्माण केलेल्या पश्‍चिम वर्‍हाडातील शेतकर्‍याला, यावर्षी सोयाबीननेदेखील प्रचंड तडाखा दिला असून, सोयाबीनच्या दर एकरी उत्पादनात तब्बल ७0 टक्के घट झाली आहे.पश्‍चिम वर्‍हाडात समावेश होणार्‍या अकोला, वाशिम व बुलडाणा या तीन जिल्ह्यांमध्ये यावर्षी सुमारे ८ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. सोयाबीन उत्पादनासाठी शेतकर्‍यांना एकरी सरासरी सुमारे १५ हजार ६00 रुपये खर्च आला आहे. दुर्दैवाने निसर्गाची साथ न मिळाल्याने यावर्षी सोयाबीनला शेंगा तर कमी लागल्याच; पण शेंगांमधील दाणेही अक्षरश: ज्वारीच्या आकाराचे आहेत. पावसाने लांबलचक उघडीप दिल्याने सोयाबीनच्या उत्पादनाला प्रचंड फटका बसला आहे. परिणामी दर एकरी उत्पादनात तब्बल ७0 टक्के घट झाली आहे. यावर्षी पावसाला उशिरा प्रारंभ झाल्यामुळे मूग, उडीद आदी कमी कालावधीच्या पिकांचा फार कमी पेरा झाला, तर बहुतांश शेतकर्‍यांनी प्रमुख पीक म्हणून कापसाऐवजी सोयाबीनला पसंती दिली. त्यामुळे दिवाळीत हातात पैसा खुळखुळण्याऐवजी, शेतकर्‍याच्या हाती खुळखुळाच आला आणि त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच गेली. पश्‍चिम वर्‍हाडात यावर्षी १६ लाख ३१ हजार ४00 हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी करण्यात आली होती. त्यामध्ये सोयाबीनचा पेरा सर्वाधिक म्हणजे ८ लाख ३७ हजार हेक्टर क्षेत्रावर झाला. सोयाबीन पिकासाठी शेतकर्‍यांना यावर्षी एकरी सुमारे १५ हजार ६00 रुपये खर्च आला आहे. पेरणीपूर्व मशागत व पेरणीचा खर्च २ हजार १00 रुपये, बियाणे व खतावरील खर्च ३ हजार ५00 रुपये, आंतरमशागत खर्च ४ हजार ५00 रुपये, पीक फवारणी खर्च २ हजार रुपये, काढणी खर्च २ हजार ५00 रुपये आणि वाहतूक खर्च १ हजार रुपये असा त्याचा तपशील आहे.