शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीपूर्वी मुंबईतील खड्डे बुजवणार

By admin | Updated: October 26, 2016 03:18 IST

दिवाळीपूर्वी मुंबईतील खड्डे बुजवण्यात येतील, अशी हमी मुंबई महापालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली असता, मुंबईतील खड्डे ३१ आॅक्टोबरपर्यंत बुजवा, असा

मुंबई : दिवाळीपूर्वी मुंबईतील खड्डे बुजवण्यात येतील, अशी हमी मुंबई महापालिकेने मंगळवारी उच्च न्यायालयात दिली असता, मुंबईतील खड्डे ३१ आॅक्टोबरपर्यंत बुजवा, असा आदेश मंगळवारी उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेसह, एमएमआरडीए, सार्वजनिक बांधकाम विभागाला (पीडब्ल्यूडी) दिला, तसेच खड्डे बुजवायचे कंत्राट काळ्या यादीत टाकलेल्या कंत्राटदारांना देऊ नका, उत्तम काम करणाऱ्या कंत्राटदारांनाच द्या, असेही या वेळी उच्च न्यायालयाने महापालिकेला बजावले.दिवाळीपूर्वी मुंबईतील खड्डे बुजवण्यात येतील, अशी हमी महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अनिल साखरे यांनी न्या. हिमांशू केमकर व न्या. एम. एस. कर्णिक यांच्या खंडपीठाला दिली. फेब्रुवारीपर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करण्यात येतील. पुढील पावसाळ्याच्या दोन-तीन महिने आधीच खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती अ‍ॅड. साखरे यांनी खंडपीठाला दिली. मरिन ड्राइव्ह व फोर्ट परिसरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचे काम अत्यंत अवघड असल्याचेही महापािलकेने खंडपीठाला सांगितले. ‘या दोन्ही ठिकाणी काम करण्यासाठी रस्ते बंद ठेवणे आवश्यक आहे. मात्र, पोलीस त्यासाठी परवानगी देत नाहीत,’ असेही अ‍ॅड. साखरे यांनी उच्च न्यायालयाला सांगितले. ‘जुन्या रस्त्यांवरून वाहतूक वळवणे शक्य आहे का बघा. रस्ते खराब झाले आहेत, तर त्यांची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. पोलिसांनी (वाहतूक) पर्यायी मार्ग शोधावा. या संदर्भात महापालिकेने न्यायालयात अर्ज करावा, आम्ही त्यावर योग्य ते निर्देश देऊ,’ असे खंडपीठाने स्पष्ट केले. त्याचबरोबर उच्च न्यायालयाने महापालिकेला खराब काम करणाऱ्या कंत्राटदारांना रस्ते दुरुस्तीचे काम देण्याचे टाळा, असेही बजावले. काही रस्त्यांवरील खड्डे महापालिका, एमएमआरडीए आणि पीडब्ल्यूडीच्या हद्दीच्या वादामुळे बुजवले जात नसल्याचे निरीक्षण नोंदवत, खंडपीठाने या सर्वांना त्यांची भूमिका स्पष्ट करून आतापर्यंत न्यायालयाच्या आदेशाचे किती पालन करण्यात आले आहे, याचा अहवालाही सादर करण्याचे निर्देश दिले. (प्रतिनिधी)...कार नाही रस्तेच खराबगेल्या सुनावणीत महापालिकेने न्यायाधीशांच्या पाठदुखीसाठी खड्डे जबाबदार नसून, त्यांच्याकडे असलेल्या जुन्या गाड्यांना जबाबदार असल्याचा युक्तिवाद करत, सर्व खापर राज्य सरकारवर फोडण्याचा प्रयत्न केला. मात्र, मंगळवारी उच्च न्यायालयाने याबाबत महापालिकेलाच सुनावले. ‘आम्हाला देण्यात आलेल्या कारवर आम्ही समाधानी आहोत. न्यायाधीशांच्या पाठदुखीला खराब कार नाही, तर महापालिकेचे रस्तेच खराब आहेत,’ असे म्हणत खंडपीठाने महापालिकेचा टोला लगावला.