शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
5
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
8
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
9
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
10
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
11
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
12
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
13
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
14
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
15
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
16
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
17
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
18
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
19
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
20
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

सासवडला रंगली दिवाळी पहाट

By admin | Updated: November 2, 2016 01:15 IST

फिटे अंधाराचे जाळे, देवाची ये द्वारी, दिल दिवाना ते सैराटपर्यंतच्या विविध गीतांचे सादरीकरण करून सोमवारी (दि. ३१) भल्या पहाटे सासवडचा कऱ्हाकाठ न्हाऊन निघाला.

सासवड : पल पल दिलके पास, शुक्रतारा, फिटे अंधाराचे जाळे, देवाची ये द्वारी, दिल दिवाना ते सैराटपर्यंतच्या विविध गीतांचे सादरीकरण करून सोमवारी (दि. ३१) भल्या पहाटे सासवडचा कऱ्हाकाठ न्हाऊन निघाला. निमित्त होते सासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित केलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. या वेळी पुण्यातील प्रथितयश गायिका आरती दीक्षित, शेखर महामुनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी तब्बल तीन तास सादर केलेल्या मराठी, हिंदी चित्रपटांतील सुरेल गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. आचार्य अत्रे सांस्कृतिक भवनातील आ. अत्रेंच्या अर्धपुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाला सुरुवात झाली. मध्यतरात राज्यमंत्री विजय शिवतारे, नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, विजयराव कोलते, देविदास कामथे यांनी समयोचित मनोगते व्यक्त करत उपक्रमाला व उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. डेक्कन बँकेचे संचालक दयानंद फडतरे यांच्यासह देविदास कामथे, नारायण जाधव यांचा सत्कार करण्यात आला. पुरंदरमध्ये विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम कारणाऱ्या सुनील कामथे, पांडुरंग सोनवणे, सासवडचे मुख्याधिकारी विनोद जळक, डॉ. विकास खैरे, रवींद्र नवलाखा आणि शिवाजी एक्के या मंडळींचा विशेष गौरव करण्यात आला. या वेळी माजी नगराध्यक्ष हेमंत भोंगळे, प्रमोद जगताप, कला फडतरे, विद्यमान नगरसेवक अजित जगताप, वामनराव जगताप, डॉ. राजेश दळवी तसेच ख्वाजाभाई बागवान, अरुणआप्पा जगताप, अण्णा खाडे यांसह विविध क्षेत्रांतील पुरंदमधील कलारसिक, युवक-युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते. पत्रकार संघाचे सुधीर गुरव यांनी प्रास्ताविक केले, हेमंत ताकवले यांनी कार्यक्रमाचे तर स्वानंद लोमटे यांनी पुरस्कारांचे सूत्रसंचलन केले. याप्रसंगी उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक भरते यांनीही एक हिंदी गीत सादर करून कार्यक्रमाची उंची वाढवली. या वेळी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कुलकर्णी, श्रीकृष्ण नेवसे, जीवन कड, प्रदीप जगताप, तानाजी सातव, शकील बागवान, शिवाजी कोलते, जगदीश शिंदे आदींनी उत्तम संयोजन केले. ‘ए मेरे वतन के लोगो’ या देशभक्तिपर गीताने या दिवाळी पहाट कार्यक्रमाची सांगता झाली. >सदाबहार गाण्यांनी रसिक मंत्रमुग्धसासवड शहर पत्रकार संघाच्या वतीने गेली ११ वर्षे हा उपक्रम सुरू आहे. यावर्षी आरती दीक्षित प्रस्तुत नक्षत्रांचे गाणे या कार्यक्रमांतर्गत गायिका आरती दीक्षित, गायक शेखर महामुनी व अरविंद पिंगळे यांनी अनेक जुनी-नवी हिंदी व मराठी गीते सादर करून प्रेक्षकांची दाद मिळवली. विजय खंडागळे, अरुण देशपांडे व राजेश देहाडे यांच्या वाद्यवृंदाने आणि कलीम पटेल यांच्या निवेदन शैलीने या कार्यक्रमाची रंगत वाढवली.