शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

दिव्यांग प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयात देणार

By admin | Updated: April 8, 2017 01:39 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी खर्च करण्यास दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.

मंचर : स्थानिक स्वराज्य संस्थांनी ३ टक्के निधी खर्च करण्यास दिरंगाई केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. अपंग प्रमाणपत्र उपजिल्हा रुग्णालयात तसेच यशवंतराव चव्हाण रुग्णालय अशा अनेक शासकीय रुग्णालयांत मिळतील, असे आश्वासन अपंगकल्याण आयुक्त नितीन पाटील यांनी दिले. आयुक्तालयावर अपंग बांधवांनी काढलेल्या मोर्चांनंतर पाटील यांनी हे अश्वासन दिले. ससून रुग्णालयामध्ये अपंग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अपंगांना खूप त्रास सहन करावा लागतोे. त्यांना वेळोवेळी हेलपाटे मारूनही अपंग प्रमाणपत्र मिळत नाही. अपंग व्यक्तींना प्रमाणपत्र मिळविण्यासाठी रात्रभर रांगेत उभे राहावे लागते. येथे रांगेत उभे असताना रुग्णालयातील कर्मचारी चांगली वागणूक देत नाहीत. हा सर्व अपंग बांधवांवर होत असलेला अन्याय अपंग बांधव व त्यांच्या कुटुंबीयांचे झालेले हाल, चालविलेला अत्याचार, छळ व शोषण या कामी प्रशासनाचा अनागोंदी, मनमानी कारभार याकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ससून रुग्णालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. संघटनेचे मकरंद पाटे, दीपक ढोबळे, योगेश रात्नत, संजय राठोड, अनिता मेमाणे, दत्तात्रय दाभाडे, अनिता पोखरकर, दीपक गायकवाड, अविनाश लबडे, वनिता मठपती, चंद्रकांत भालेराव, विजय साठे इ. अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले.ससून रुग्णालयात आंदोलन करीत असताना अधीक्षक डॉ. अजय तावरे हे उपस्थित राहून आम्हाकडून तसेच येथील कर्मचाऱ्यांकडून अपंगांना यापुढे कुठलाही त्रास होऊ देणार नाही, अशी ग्वाही दिली. अपंग व्यक्तींना शौचालयाची स्वतंत्र व्यवस्था करू, असे आश्वासन तावरे यांजकडून देण्यात आले. हे आंदोलन सकाळी ७ ते ११ पर्यंत चालू होते. मनसे उपजिल्हाध्यक्ष मकरंद पाटे यांनी ससूनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून ससून रुग्णालयात फक्त १२० अपंगांना प्रमाणपत्र देत असत. आता हा कोटा १५० पर्यंत करण्यात आला. त्यानंतर आंदोलन थांबवून ससून रुग्णालय ते अपंगकल्याण आयुक्तालयापर्यंत अपंगांची रॅली काढण्यात आली. त्यानंतर कार्यकर्ते प्राणांतिक उपोषणास बसून महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. (वार्ताहर)संघटनेची कार्यकारिणी यांनी अपंगकल्याण आयुक्त नितीन पाटील यांची समक्ष भेट घेतल्यानंतर ३ टक्के निधीबाबत यापूर्वी आम्ही सूचना दिल्या आहेत. प्रमाणपत्र वितरण करण्याबाबत सूचना उपजिल्हा रुग्णालयांना देण्यात आल्या असून फक्त शुक्रवार हा दिवस ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयंसाठी अपंगत्वाचे प्रमाणपत्र देण्याकरीता निश्चित करण्यात आला आहे. या मागण्या पूर्ण झाल्याने अपंगांनी उपोषण थांबविले.