शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
4
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
5
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
6
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
7
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
8
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
9
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
10
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
11
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
12
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
13
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
14
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
15
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
16
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
17
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
18
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
19
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
20
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
Daily Top 2Weekly Top 5

दिव्यांग प्रेमीयुगुलाच्या प्रेमात कुटुंबीयांचा अडसर !

By admin | Updated: September 29, 2016 01:56 IST

दामिनी पथकाने दिला आधार, प्रेयसीने काढली रात्र सुधारगृहात.

नीलेश शहाकार बुलडाणा, दि. २८- आयुष्यात एकमेकांना आधार देऊन सुखी संसाराची स्वप्न रंगविणारी दिव्यांग प्रेयसी प्रियकराच्या शोधात बुलडाण्यात आली. प्रियकराचा शोधही घेतला; त्याच्या घरी पोहचली,परंतु त्याच्या वडिलांनी विरोध तिला घरातून हाकलून दिले.अखेर निराश झालेल्या या तरुणीला बसस्टँडवर दामिनी पथकाने आधार दिला. रात्रभर सुधारगृहात राहिल्यानंतर तिला तिच्या मूळ पुणे या गावाला पाठविण्यात आले. ही घटना २७ सप्टेंबर रोजी घडली.प्रेम आंधळे असते, त्याला जातपात नसते, असे नेहमीच म्हटले जाते; परंतु प्रतिष्ठेपायी अनेक कुटुंब आजही आपल्या मुलांच्या प्रेमविवाहाला मान्यता देत नाही. असाच अनुभव या घटनेनिमित्त आला. बुलडाणा जिल्ह्यातील रहिवासी व सध्या पुण्यात कॉल सेंटरवर काम करणारा दोन्ही पायांनी दिव्यांग असलेल्या प्रदीप (बदललेले नाव) या तरुणाचे प्रेमसंबंध दिव्यांग असलेल्या पुण्यातील प्रेमलता (बदललेले नाव) हिच्याशी जुळले. दोघांचाही एकमेकांवर विश्‍वास बसल्यानंतर त्यांनी सोबतच आयुष्य जगण्याच्या आणाभाका घेतल्या. दरम्यान, प्रदीप व प्रेमलताच्या प्रेमप्रकरणाची माहिती त्याच्या वडिलांना समजली. प्रदीपच्या वडिलांनी त्याला काही कामानिमित्त गावाकडे बोलावले. प्रदीप गावी परत आल्यावर त्याचा प्रेमलताशी संपर्क होईना. अखेर प्रदीपच्या शोधात हेमलता त्याचा शोध घेत मंगळवारी थेट बुलडाण्यात दाखल झाली. प्रदीपने दिलेल्या त्याच्या घरच्या पत्त्यावर ती घरीही पोहोचली. प्रदीपच्या कुटुंबीयांना मात्र प्रेमलता- प्रदीपचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. मुलाच्या वडिलांनी दोघांच्या विवाहाला नकार दिला. तेवढय़ावर ते थांबले नाही, तर प्रेमलताला मारहाण करून घराबाहेर काढले. प्रेमलता रात्री आठ वाजता बसस्थानकावर पोहोचली. तेथे आपल्या अश्रूंना तिने वाट मोकळी करुन दिली. प्रेमलता रडत असताना ती पोलिसांच्या दृष्टीस पडली. पोलिसांनी तातडीने दामिनी पथकाला बोलावून घेतले. यावेळी पथकप्रमुख सायरा शाह, आशा पवार, कविता मोरे, संगीता म्हसाळ, ज्योती जाधव यांनी तत्काळ बसस्थानक गाठले. प्रेमलताची आपबिती ऐकल्यानंतर दामिनी पथकाने तिला आधार देत रात्रभर राहण्यासाठी सुधारगृहात पाठविले. बुधवारी सकाळी तिला पुण्याकडे रवाना करण्याची व्यवस्था करून रवानगी केली.-या घटनेतील दिव्यांग तरुणी पुण्यातील असून, ती प्रियकराच्या शोधात बुलडाण्यात आली होती. या दरम्यान, तिला बर्‍याच अडचणीला तोंड द्यावे लागल्याची भावना तिने स्वत: पथकाजवळ व्यक्त केली. तिच्या सुरक्षेसाठी रात्रभर सुधारगृहात ठेवून आज सकाळी तिला पुण्याला रवाना करण्यात आले.- सायरा शाह, दामिनी पथकप्रमुखपोलीस स्टेशन, बुलडाणा