शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

घटस्फोटीता पतीचे नाव लावू शकते

By admin | Updated: January 16, 2015 06:16 IST

घटस्फोटीत महिला तिच्या पतीचे किंवा स्वत:च्या वडिलांचेही आडनाव लावू शकते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे़

मुंबई : घटस्फोटीत महिला तिच्या पतीचे किंवा स्वत:च्या वडिलांचेही आडनाव लावू शकते, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला आहे़ महत्त्वाचे म्हणजे घटस्फोटानंतर पतीचे आडनाव लावण्यास प्रतिबंध करणारा कोणताही कायदा नाही़ पतीचे आडनाव लावण्यासाठी त्याच्याकडून ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे, असादेखील नियम नसल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे़न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने हा निकाल दिला आहे़ यासाठी पुणे येथील ६२वर्षीय महिलेने अ‍ॅड़ असीम सरोदे यांच्यामार्फत याचिका दाखल केली होती़ या महिलेला पुणे पारपत्र कार्यालयाने २००२मध्ये पारपत्र दिले होते़ याचे नूतनीकरण करण्यासाठी या महिलेने ६ मार्च २०१२ रोजी कार्यालयाकडे अर्ज केला़मात्र २००३मध्ये तुमचा घटस्फोट झाला आहे़ तरीही तुम्ही पतीचे आडनाव लावत आहात़ तेव्हा या नावे पारपत्र घेण्यासाठी तुम्ही पतीकडून ना हरकत पत्र घ्यावे, असे या कार्यालयाने महिलेला पत्र धाडले़ हे पत्र बेकायदा असून ते रद्द करावे, अशी मागणी महिलेने याचिकेत केली़ याची दखल घेत न्यायालयाने पारपत्र कार्यालय व केंद्र सरकारला नोटीस जारी केली़ याचे प्रत्युत्तर या दोन्ही प्रतिवादींनी दिलेले नाही़ त्यानंतर या याचिकेवर अंतिम सुनावणी होणार असल्याचे न्यायालयाने जाहीर केले़ या सुनावणीलाही या प्रतिवादींचे वकील हजर राहिले नाहीत़ अखेर न्यायालयाने वरील निर्वाळा देत पुणे पारपत्र कार्यालयाचे पत्र बेकायदा असल्याचे नमूद करीत रद्दबातल ठरवले़ (प्रतिनिधी)