शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात दिव्यांगांना ओळखपत्रांचा विळखा

By admin | Updated: June 20, 2017 02:24 IST

दारिद्र्यरेषेखालील सवलतींचा लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिका आणि उत्पन्नाचा दाखला इतका पुरेसा ठरतो. सरकारच्या सर्वच सवलतींसाठी तो ग्राह्य धरण्यात येतो

विशाल शिर्के। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : दारिद्र्यरेषेखालील सवलतींचा लाभ घेण्यासाठी पिवळी शिधापत्रिका आणि उत्पन्नाचा दाखला इतका पुरेसा ठरतो. सरकारच्या सर्वच सवलतींसाठी तो ग्राह्य धरण्यात येतो. दिव्यांग व्यक्तींना मात्र, रेल्वे, एसटी, हवाई वाहतुकीसाठी नियमानुसार असलेली प्रवास सवलत हवी असेल तर प्रत्येकाचे वेगवेगळे (युनिक आयडेंटीटी कार्ड) तयार करावे लागत आहे. त्यामुळे ओळपत्रांच्या जाचातून आमची सुटका करा, अशी मागणी दिव्यांग व्यक्तींमधून केली जात आहे.केंद्र सरकारच्या सूचनेनुसार राज्य सरकारने १५ मार्च १९८४ रोजी दिव्यांग व्यक्तींना विमान, रेल्वे, बस प्रवास, शिष्यवृत्ती, विद्यावेतन, कृत्रीम अवयवे आणि साधने, वाहन भत्ता, पेट्रोल खर्चात सवलत, व्यवसायकर अणि प्राप्तीकर सवलत मिळविण्यासाठी विशेष ओळखपत्र देण्यास सुरुवात केली. जिल्हा समाज कल्याण अधिकाऱ्यांच्या मार्फत हे ओळखपत्र देण्यात येत होते. शिधापत्रिकेप्रमाणे त्यावर कोणत्या सवलतीचा फायदा घेतला याची नोंद करण्याची सुविधादेखील होती. या शिधापत्रिकेचा वापर केवळ एसटी पास पुरताच झाला आहे.रेल्वे, एसटी, स्थानिक बस सेवा अशा सर्वच सेवांना वेगवेगळे ओळखपत्र घ्यावे लागत आहे. आता केंद्र सरकारच्या युनिक आयडीसाठी पुन्हा शारीरिक तपासणीसह सर्व प्रक्रिया राबविण्यात येत आहे. ज्यांनी नुकतेच राज्य सरकारच्या प्रमाणपत्रासाठी जिल्हा रुग्णालयांकडून तपासणी केलेली आहे त्यांना यातून वगळले पाहिजे. - हरिदास शिंदे, अध्यक्ष,अपंग हक्क सुरक्षा समिती पुढील काळात दिव्यांगांच्या सर्व योजनांसाठी केंद्र सरकारचे युनिक डिसअ‍ॅबिलिटी आयडी ग्राह्य धरण्यात येईल. ही प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राज्य सरकारचे प्रमाणपत्र ग्राह्य धरावे. एसटी, पीएमपी, रेल्वे आणि विमान सवलतीसाठी वेगळे ओळखपत्र नसावे. त्यासाठी नवा आध्यदेश काढण्यात येणार आहे.- नितीन ढगे,उपायुक्त, अपंग कल्याण