शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

वैविध्यपूर्ण सांस्कृतिक मेजवानी

By admin | Updated: February 17, 2016 03:17 IST

देशाच्या सांस्कृतिक वैविध्यतेची झलक मेक इन इंडिया सेंटरवर अनुभवायला मिळत आहे. विविध राज्यांतील सांस्कृतिक आविष्कार एकाच व्यासपीठावर

मुंबई : देशाच्या सांस्कृतिक वैविध्यतेची झलक मेक इन इंडिया सेंटरवर अनुभवायला मिळत आहे. विविध राज्यांतील सांस्कृतिक आविष्कार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळत असल्याने नागरिकही या कार्यक्रमांसाठी मोठी गर्दी करत आहेत. काश्मीर, पंजाब, हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात, केरळ, मिझोरम, सिक्कीम आणि मणिपूरची पथके मेक इन इंडिया सेंटरवर आपली कला सादर करीत आहेत. काश्मिरातील युवक-युवतींचा गट पारंपरिक नृत्य सादर करीत आहे. तर, विवाह आणि अन्य शुभप्रसंगी केले जाणारे मणिपुरचे पुंगचेलम नृत्य, मध्य प्रदेशचे बधाई नृत्य, गुजराती होळी व आदिवासी नृत्य आणि मिझोरामच्या बांबू नृत्यामुळे मेक इन इंडियाच्या कॉर्पोरेट वातावरणात ‘पारंपरिक सूर’ मिसळले आहेत. सिक्कीम पथकाचे सिंगीचम हे नृत्य आणि युद्धप्रकार आपले वेगळेपण राखून आहे. वाघाचा मुखवटा आणि झूल अंगावर पांघरलेले कलाकार विविध कसरती करतात. पंजाब, मणिपूर आणि केरळच्या पथकांनी शारीरीक कसरती आणि युद्धप्रकार सादर केले. पंजाबी पथकातील पैलवान पोलादी सळई वाकविणे, गळ्यावरील लोखंडी सळईने अन्य पैलवानाचे वजन पैलणे आदी चित्तथराररक कसरती करतात.प्रत्येक पथकाभोवती प्रेक्षकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. प्रत्येकजण हा नृत्याविष्कार आपल्या मोबाइलमध्ये टिपण्याची धडपड करतो. तर, अनेक जण या कलाकारांसोबत सेल्फी काढण्याची हौस भागवून घेतात.