शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

दिवा-रोहा दुपदरीकरण अखेर पूर्ण!

By admin | Updated: April 12, 2017 02:28 IST

कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसबरोबरच पॅसेंजर ट्रेनला मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा हद्दीतून जावे लागते. मात्र, उपलब्ध असलेला एकेरी मार्ग आणि त्यामुळे दिवा ते रोहा अंतर पार करण्यास

मुंबई : कोकणात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसबरोबरच पॅसेंजर ट्रेनला मध्य रेल्वेच्या दिवा-रोहा हद्दीतून जावे लागते. मात्र, उपलब्ध असलेला एकेरी मार्ग आणि त्यामुळे दिवा ते रोहा अंतर पार करण्यास लागणारा वेळ पाहता, या मार्गाचे दुपदरीकरण करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने काही वर्षापूर्वी घेतला. हे काम नुकतेच पूर्ण झाले असून, त्यामुळे एक्स्प्रेससह पॅसेंजर ट्रेनच्या वेळेत चांगलीच बचत होत आहे, अशी माहिती रेल्वेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. कोकण रेल्वेकडून रोहा ते ठोकुरपर्यंतचे दुहेरीकरण केले जाणार आहे. दुहेरीकरण केल्यामुळे मेल-एक्स्प्रेस गाड्यांचा मार्ग सुकर होईल. सध्या एकच मार्ग उपलब्ध असल्याने एखादा अपघात झाल्यास संपूर्ण सेवा कोलमडते. त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. ही समस्या लक्षात घेता, या मार्गांवर ११ हजार कोटी रुपये खर्च करून दुहेरीकरण केले जात आहे. मात्र, त्या आधी मध्य रेल्वेकडून त्यांच्या हद्दीतील दुहेरीकरणाचे काम मार्गी लावले जात आहे. पनवेल ते रोहा असे १११ किलोमीटर दुहेरीकरणाचे काम पूर्ण करण्यावर मध्य रेल्वेकडून भर देण्यात आला. यात पनवेल ते पेणसाठी २७० कोटी रुपये, तर पेण ते रोहासाठी ३७० कोटींची तरतूद रेल्वेकडून करण्यात आली. यातील प्रथम पनवेल ते पेणपर्यंतचे काम पूर्ण केले. त्यानंतर, पेण ते रोहा टप्प्यातील सर्व कामे पूर्ण करून नागोठणे ते रोहा या अवघ्या १३ किलोमीटरचे काम बाकी होते. काम डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार होते. परंतु, या मार्गातील जागेवरून वाद होता. त्यावर तोडगा काढल्यानंतर, मार्चमध्ये काम पूर्ण झाले असून एप्रिलपासून दुहेरी मार्ग सेवेत आला. (प्रतिनिधी)1सध्या एक्स्प्रेस ट्रेनला दिवा ते रोहापर्यंत जाण्यासाठी साधारपणे दोन तास तर पॅसेंजर गाड्यांना किमान तीन तास लागतात. दुपदरीकरणाचे काम पूर्ण झाल्याने, त्यांच्या वेळेत बचत होण्यास सुरुवात झाली आहे.2दुहेरीकरणामुळे दिघी बंदरावरील भार कमी होतानाच, न्हावा शेवा बंदराकडेही मालाची ने-आण करताना लागणारा वेळ कमी होत आहे.