शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

तीन आठवड्यांत विहीर खोदून टंचाईवर मात !

By admin | Updated: September 8, 2015 05:27 IST

अख्खा मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत असताना बीड तालुक्यातील बाभूळवाडीने केवळ तीन आठवड्यांत विहीर खोदून गावच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. सरकारी पैशांची वाट न

- संजय तिपाले,  बीडअख्खा मराठवाडा दुष्काळाच्या झळा सोसत असताना बीड तालुक्यातील बाभूळवाडीने केवळ तीन आठवड्यांत विहीर खोदून गावच्या डोक्यावरचा हंडा कायमचा उतरविला. सरकारी पैशांची वाट न पाहता सरपंचांनी स्वत:चे १० लाख ओतले. अवघ्या ४० फुटांवर विहिरीला पाणी लागल्याने पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती थांबली आहे. बाभूळवाडी (ता.बीड) या ग्रामपंचायती अंतर्गत बेडूकवाडी, बेलवाडी ही दोन गावे येतात. यापैकी बेडूकवाडी हे साधारण तेराशे लोकसंख्येचे गाव. गावच्या डोक्यावर कायम घागर. पाऊस कितीही झाला तरी दरवर्षी टँकर ठरलेला. यंदा तर मी मी म्हणणाऱ्या गावानेही पाणीटंचाईच्या झळा सोसल्या. त्यामुळे बेडूकवाडीकरांच्या डोक्यावर भर पावसाळ्यात घागर दिसू लागली. जुन्या योजेनतील विहीर कोरडीठाक पडल्याने पाणीप्रश्न ऐरणीवर आला. गावातील तीन हातपंपांना पाणी यायचे. तेही कोरडेठाक पडले. माणसांनाच पाणी मिळणे कठीण झाले. जनावरांचे तर हाल विचारायलाच नको. पाण्यासाठी गावकऱ्यांची रानोमाळ भटकंती सुरू झाली. सरपंच परमेश्वर सातपुते यांनी बेडूकवाडीसाठी नरेगातून विहीर मंजूर करून आणली. तहान लागल्यावर विहीर खोण्याचा प्रकार म्हणून हिणवले जाऊ लागले. काम पूर्ण कधी व्हायचे अन् गावाला पाणी कधी मिळायचे, असे प्रश्न उपस्थित झाले; परंतु सातपुते खचले नाहीत. तांत्रिक अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने मनकर्णिका तलावात स्थळ निश्चित करून आॅगस्ट महिन्यात विहिरीचे खोदकाम सुरू झाले. शासन निधीची प्रतीक्षा न करता सातपुते यांनी पदरचे १० लाख रुपये खर्च केले. २१व्या दिवशी विहिरीला ४० फुटांवर पाणी लागले. विहिरीमुळे कायमचा प्रश्न मार्गी लागला. टँकरवर होणारा खर्च तर वाचलाच; पण गावकऱ्यांचाही त्रास वाचला. - परमेश्वर सातपुते, सरपंच, बाभूळवाडी.