शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाचे ‘ठाणे’

By admin | Updated: July 2, 2016 03:38 IST

जिल्ह्यातील सातही तालुक्यांत मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून जून महिन्यात ४४८.४० मिमी पावसाची नोंद झाली.

ठाणे : जिल्ह्यातील सातही तालुक्यांत मागील २४ तासांत मुसळधार पाऊस पडला असून जून महिन्यात ४४८.४० मिमी पावसाची नोंद झाली. गुरुवारपासून संततधार सुरू असून ६४ मिमी पावसाची नोंद झाली. ठाणे शहरात सर्वाधिक म्हणजे तब्बल ९०० मिमी पाऊस झाला आहे. धरण परिसरातही कालपासून पावसाचे प्रमाण चांगले असून शहराना पाणीपुरवठा करणाऱ्या भातसा, बारवी, आंध्रा, तानसा आदी धरणांमध्ये पाऊस पडला आहे. सर्वाधिक २४ मिमी पाऊस भातसा आणि बारवी धरणात झाला आहे. मात्र, धरण क्षेत्राची पातळी सुधारण्याकरिता अजून पावसाची प्रतीक्षा आहे.भिवंडी तालुक्यात सर्वाधिक १२० मिमी पाऊस पडला असून याखालोखाल ठाणे येथे १११ मिमी, उल्हासनगरला ५५मिमी, कल्याण ५४ मिमी, अंबरनाथ ४९ मिमी, शहापूर ४२ मिमी पाऊस झाला आहे. सर्वात कमी म्हणजे १७ मिमी पाऊस मुरबाड तालुक्यात झाल्याची नोंद आहे. आज दिवसभरही सुरू असलेली संततधार वनोत्सवानिमित्तच्या वृक्षलागवडीसाठी उपयुक्त ठरली. अनेक दिवस ओढ दिलेल्या पावसाचे आता शहरी भागात दमदार आगमन झाले आहे. गुरुवारी रात्रीपासून पडत असलेल्या पावसाने मागील वर्षाचे रेकॉर्ड मोडीत काढले आहे. मागील वर्षी ठाणे शहर आणि परिसरात १ जुलैपर्यंत ८६२.५० मिमी पावसाची नोंद झाली होती. तर, यंदा शुक्रवार, १ जुलैपर्यंत ९०० मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, रात्रीपासून पडत असलेल्या पावसामुळे ठाणे शहराच्या अनेक भागात पाणी तुंबण्याचे प्रकार घडले होते. वंदना सिनेमा, चंदनवाडी, श्रीरंग आदी पाच ठिकाणी पाणी तुंबले होते, असे नियंत्रण कक्षाने सांगितले. ठामपाच्या आपत्कालीन कक्षाकडे एकूण २०तक्र ारींची नोंद झाली. त्यामध्ये १ आग, ९ झाडे कोसळण्याच्या, एक भिंत कोसळल्याच्या तक्रारींचा समावेश होता. तर, शास्त्रीनगर भागातील कांबळे चाळीजवळ असलेला नारळाचा वृक्ष पडून प्रतीक कांबळे हा तरुण किरकोळ जखमी झाला आहे. गेली तीन वर्षे पावसाने ओढ दिल्यामुळे यंदा अधिक पाऊस पडावा, अशी अपेक्षा सर्वच लोक बाळगून आहेत. पावसाने जूनच्या पहिल्या आठवड्यात पाठ फिरवली. मात्र, त्यानंतर जूनच्या उत्तरार्धातील पंधरवड्यात महिनाभराची पावसाची सरासरी पूर्ण केली. गेल्या २४ तासांत ठाणे शहरात १४१ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसांतील हा उच्चांक असल्याचे समजते. दरम्यान, ठाणे जिल्ह्याच्या शहरी भागात पावसाने दमदार हजेरी लावली असली तरी त्या तुलनेत धरण क्षेत्रामध्ये अद्यापही पावसाने हवा तसा जोर पकडलेला नाही.