शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

जिल्हा परिषदेच्या शाळेत सामान्य विद्यार्थ्यांना दिले जाते मुकबधीराचे शिक्षण

By admin | Updated: April 20, 2017 09:16 IST

मुकबधीरांच्या व्यथा सर्वसामान्य नागरिकांनाही कळाव्यात यासाठी देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे.

ऑनलाइन लोकमत 

वाशिम, दि. 20 - मुकबधीरांच्या व्यथा सर्वसामान्य नागरिकांनाही कळाव्यात यासाठी देपूळ येथील जिल्हा परिषद शाळेने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. वर्गातील सामान्य विद्यार्थ्यांना मुकबधीर विद्यार्थ्यांचे शिक्षण दिले जात आहे. यामध्ये विद्यार्थी एवढे पारंगत झाले आहेत की, कोणत्याही प्रश्नाचे उत्तर इशाऱ्याने पटापट देतात. या शाळेचे जिल्हयात कौतूक केले जात आहे.

वाशिम तालुक्यातील छोटेस गाव देपूळ. येथे असलेल्या जिल्हा परिषद शाळेतील शिक्षिका संजीवनी नामदेव चव्हाण यांना मुकबधीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबाबतची माहिती असल्याने त्यांनी शाळेत सर्वसामान्य विद्यार्थ्यांना याचे ज्ञान असावे म्हणून मुख्याध्यापक सुरेश उगले यांच्याशी चर्चा केली. उगले यांनी सुध्दा संजिवनी चव्हाण यांच्या कल्पनेचे स्वागत केले. आजच्या घडीला मुख्याध्यापक उगले यांच्या मार्गदर्शनाखाली संजिवनी चव्हाण विद्यार्थ्यांना मुकबधीर विद्यार्थ्यांचे शिक्षण देत आहेत. असे दिले जाते शिक्षण!शैक्षणिक गुणवत्ता वाढीसोबातच विद्यार्थ्यांना मुकबधीर असलेल्या विद्यार्थ्यांचे शिक्षण कृतीतून दिल्या जाते. तसेच त्यांना कोणतीही वस्तू, पदार्थ समोर ठेवून शब्द तयार करण्याचे सुध्दा प्रशिक्षण दिल्या जात आहे. मला, मी मुकबधीराच्या भाषेत बोलायचे असेल तर ह्दयाजवळ हात ठेवून सांगितल्या जाते. असे अनेक शब्द वाक्य विद्यार्थ्यांना सांगून शिक्षण दिल्या जात आहे. इयत्ता तीसरीतील विद्यार्थ्यांना आता इशाऱ्याने वाक्य सांगीतल्या जाताहेत विद्यार्थी त्याचे पटापट उत्तरे देत आहेत. विशेष म्हणजे विद्यार्थी उत्तरे देण्यासाठी सर्वच वर्ग हातवर करीत असल्याचे दिसून येत आहे.मुकबधीरांच्या समस्या, अडचणी सर्वसामान्यांना समजाव्यात हाच मुख्य उद्देश या उपक्रमाच्या मागचा आहे. चिमुकल्यांची स्मरणशक्ती दांडगी असल्याने त्यांना आतापासून जर हे शिक्षण मिळाले तर ते कधीही विसरु शकत नाहीत. कोणतेही ज्ञान अवगत केल्यास ते व्यर्थ जात नसते, या उदेशाने आपण हा उपक्रम मुख्याध्यापकांच्या मार्गदर्शनाखाला राबवत आहे. यामुळे विद्याथ्यार्ना मुकबधीर नागरिकांच्या व्यथा कळत आहेत. भविष्यात कुठेना कुठे हे शिक्षण त्यांच्या नक्कीच उपयोगी पडेल.- संजिवनी चव्हाण, शिक्षिका, जिल्हा परिषद शाळा, देपूळ