शहरं
Join us  
Trending Stories
1
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
4
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
5
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
6
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
7
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
10
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
11
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
12
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
13
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
14
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
15
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
16
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
17
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
18
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
19
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
20
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील मतदार संघ घटले

By admin | Updated: August 23, 2016 02:47 IST

वाढत्या लोकसंख्येचा रेशो मेन्टेन करण्याचा परिणाम हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य संख्येवर झाला

आविष्कार देसाई,

अलिबाग- जिल्ह्यातील वाढत्या लोकसंख्येचा रेशो मेन्टेन करण्याचा परिणाम हा जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्य संख्येवर झाला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ही ६२ वरून घसरून ६१ वर आली आहे. मात्र पनवेलला याचा सर्वाधिक फायदा झाल्याने तेथील सदस्य संख्या सहाने वाढून १६ झाली आहे. काही मतदार संघ घटल्याने दिग्गजांना फटका बसला आहे, तर काही ठिकाणी नव्याने वाढलेल्या मतदार संघामुळे इच्छुकांची राजकीय महत्त्वाकांक्षा फळाला येण्याची शक्यता आहे.काही दिवसांपूर्वी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासनाने रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सदस्यांची स्थिती कशी असेल, हे जाहीर केले होते. त्यामध्ये ६२ सदस्यांची जिल्हा परिषद ६१ सदस्यांची झाल्याचे समोर आले. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या का कमी झाली, पनवेल तालुक्यातीलच सदस्यांची संख्या का वाढली, असे विविध प्रश्न रायगडच्या जनतेला पडले आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य कमी जास्त होण्यासाठी कोणीच जबाबदार नसून ते लोकसंख्येच्या गणितीय सूत्रानुसार ठरलेले आहे. हे सूत्र ठरविताना पुणे जिल्ह्याची (क्ष) सर्वाधिक लोकसंख्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याची (य) सर्वाधिक कमी लोकसंख्या गृहीत धरली आहे. त्या निकषानुसार पुणे जिल्ह्यासाठी ७५ जिल्हा परिषद सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ५० जिल्हा परिषद सदस्य मर्यादा आखलेली आहे.पुणे जिल्ह्याची लोकसंख्या ३८ लाख ४७ हजार ३३२, तर सिंधुदुर्ग जिल्ह्याची लोकसंख्या ७ लाख ३८ हजार ४४७ अशी आहे. क्ष वजा य भागीले २५ (३८,४७,३३२ वजा ७, ३८,४४७ भागीले २५) ३१,०८८८५ भागीले २५ बरोबर १,२४,३५५ या सूत्रानुसार रायगडची लोकसंख्या २१,३७,८३१ वजा सिंधुदुर्गची लोकसंख्या ७,३८,४४७ बरोबर १३,९९,३८४. याच १३,९९,३८४ ला १,२४,३५५ ने भागल्यास ११.२५ असा रेशो येतो. त्यानुसार कमीतकमी असणारी सदस्य संख्या ५० अधिक ११.२५ बरोबर ६१ ही संख्या मिळते. तीच रायगड जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या राहणार आहे, तर त्याच्या दुप्पट १२२ पंचायत समितीचे सदस्य संख्या येते. एका जिल्हा परिषद मतदार संघासाठी सुमारे ३५ हजार मतदार आहेत, पंचायत समितीसाठी १७ हजार ५०० मतदार असणार आहेत.>लोकसंख्येच्या सूत्रानुसारच जिल्हा परिषद सदस्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे. हेच सूत्र सर्वत्र लावण्यात आले आहे. रेशो मेन्टेन करताना रायगड जिल्हा परिषदेची सदस्य संख्या ६१ आली आहे.-किरण पाणबुडे, उपजिल्हाधिकारी, रायगड