शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षकांच्या रिक्तपदांमुळे पालकांनी उन्हात भरविली जि.प.ची शाळा

By admin | Updated: January 2, 2017 18:49 IST

चार वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असल्याचे पाहून संतप्त झालेल्या धनेगाव (ता. देवणी) येथील नागरिकांनी सोमवारी चार तास शाळा बंद केली

ऑनलाइन लोकमतलातूर, दि. 2 - चार वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असल्याचे पाहून संतप्त झालेल्या धनेगाव (ता. देवणी) येथील नागरिकांनी सोमवारी चार तास शाळा बंद केली आणि त्यांनीच व्हरांड्यातच शाळा भरविली. दरम्यान, प्रखर उन्हामुळे दोन विद्यार्थ्यांना भोवळ आली़ सुदैवाने कुठलीही दुर्दैवी घटना घडली नाही.देवणी तालुक्यातील धनेगाव येथे जिल्हा परिषदेची शाळा असून, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग भरतात. शाळेत १०७ विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांसाठी चार शिक्षकांची पदे असली तरी त्यातील दोन पदे रिक्त असून एका शिक्षकाची बदली आहे. चार वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक आहेत.नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी शाळा भरली होती. दरम्यान, शिक्षक कमी असल्याने आमच्या पाल्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे म्हणत सरपंच त्र्यंबकराव सूर्यवंशी, सोनू डगवाले, पुंडलिक बिरादार, रामलिंग शेरे, ज्ञानोबा बिरादार आदी गावकऱ्यांनी शाळेत येऊन विद्यार्थ्यांना वर्गाबाहेर काढले. या विद्यार्थ्यांना व्हरांड्यात बसवून त्यांनीच शाळा भरविली. कडक उन्हामुळे शाळेतील दोन विद्यार्थ्यांना भोवळ आली. दरम्यान, दुपारी शिक्षण विस्तार अधिकारी संतोष स्वामी यांनी भेट देऊन उद्यापासून अन्य एक शिक्षक उपलब्ध करुन दिले जाईल, असे सांगितले. त्यामुळे गावकऱ्यांनी माघार घेतली.