शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
2
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
3
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
4
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
5
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
6
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
7
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
8
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
9
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
10
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
11
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
12
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
13
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
14
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
15
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
16
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
17
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
18
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
19
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
20
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर!

By admin | Updated: March 4, 2017 03:39 IST

महसूलमंत्री, विरोधी पक्षनेते, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे चौकशीसह कारवाईचे सुमारे ४३ आदेशही निघाले आहेत

ठाणे : शेतजमीन हडप केल्याप्रकरणी महसूलमंत्री, विरोधी पक्षनेते, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांचे चौकशीसह कारवाईचे सुमारे ४३ आदेशही निघाले आहेत. मात्र, ते सारे धाब्यावर बसवून कल्याणचे प्रांत, तहसीलदार यांच्याकडून शेती हडप करणाऱ्या व्यापाऱ्यास पाठीशी घातले जात आहे. यामुळे या अधिकाऱ्यांवर शिस्तभंग व फौजदारी गुन्हे दाखल करा, यासाठी कल्याणजवळील वाघेरेपाडा येथील आदिवासी बाळाराम शिद यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साकडे घातले आहे. सुमारे सात वर्षांपासून कल्याणच्या वाघेरेपाड्यातील शिद हे आदिवासी शेतकरी व समाजसेवक विशाल गुप्ता हे प्रशासनाचे उंबरठे झिजवत आहेत. कल्याण-नगर राष्ट्रीय महामार्गास लागून असलेली करोडो रुपयांची शेतजमीन खरेदीची खोटी कागदपत्रे सादर करणारे, मूळचे शेतकरी नसलेले उल्हासनगर येथील प्रकाश बुधराणी व त्यांच्या साथीदारांना प्रांत, तहसीलदार, मंडल अधिकारी आणि तलाठी पाठीशी घालत आहेत. खोटेनाटे कागदपत्र तयार करण्यास मदत करून जमिनी हडप केल्याची तक्रार या शेतकऱ्यांनी नुकतीच मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. यास अनुसरून ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनादेखील त्यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे. यामध्ये विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, महसूल विभागदेखील अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.शेतकऱ्याची वाघेरेपाडा गावाजवळील सर्व्हे. नं. ४७/१-अ, ब ही जमिन परस्पर विक्री झाल्याचे शिद यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले. खरेदीचे खोटे व निरर्थक कागदपत्र सादर करणारा हा शेतकरी नसल्याचा न्यायालयीन आक्षेप असतानाही प्रांत व तहसीलदारांनी खरेदी खताच्या फेरफार नोंदी केल्या आहेत. तसेच येथे १२ गोडाऊन बांधूनही केवळ सहा दाखवण्यात आले. (प्रतिनिधी)> महामार्गालगत ही शेतजमीन असून सुमारे एक किमी असल्याचा खोटा अहवाल तयार केलेला आहे. शेतजमिनीवरील या गोडाऊनमध्ये सुरू असलेले लघुउद्योग त्वरित बंद करून ती तोडण्यात यावीत. विद्युतपुरवठा खंडित करावा, आदी स्वरूपाच्या कारवाई आदेशांवर प्रांत, तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी यांनी अद्यापही कारवाई केली नाही. यामुळे या अधिकाऱ्यांसह खोटा शेतकरी असलेल्या बुधराणी यांच्यावरदेखील कडक कारवाई करण्याची मागणी या आदिवासी शेतकऱ्याने मुख्यमंत्री, मुख्य सचिव यांच्याकडे लावून धरली आहे.