शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील जिल्हा बँकांही स्वीकारणार ५००, १००० च्या नोटा

By admin | Updated: November 10, 2016 20:40 IST

राज्यभरातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्विकाराव्यात असे आदेश रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिले आहेत.

ऑनलाइन लोकमत
कोल्हापूर, दि. 10 -  राज्यभरातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकांनी ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा स्विकाराव्यात असे आदेश रिझर्व्ह बँकेने गुरुवारी दिले आहेत. त्यामुळे या बँकांमध्ये पैसे भरण्यास लोकांची सोय झाली आहे. ग्रामीण महाराष्ट्रात जिल्हा बँकांचेच नेटवर्क भक्कम असल्याने या बँकातून नोटा न स्विकारण्याचा धोरणाबद्दल नाराजी व्यक्त होत झाली होती.
रिझर्व्ह बँकेने बुधवारी एक परिपत्रक काढून बँकींग व्यवहाराबध्दल सूचना दिल्या. त्यामध्ये अर्बन को-ऑप व स्टेट को-ऑप बँकांना ५०० आणि १००० च्या नोटा स्विकारता येणार नाहीत असे म्हटले होते. स्टेट को-ऑप बँकेचा अर्थ राज्य बँक असा घेवून राज्य बँकेच्या अधिका-यांनी सर्व जिल्हा बँकांना अशी कॅश स्विकारू नका असे तोंडी आदेश दिले. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रशासनाने आम्ही तोंडी सूचना मान्य  करणार नाही, लेखी द्यावे असा आग्रह धरला. तोपर्यंत थेट रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयाशीही संपर्क साधून विचारणा करण्यात आली. त्यानंतर रिझर्व्ह बँकेने त्याबाबतची स्पष्टता केली. त्यामुळे पांचशे व एक हजार रुपयांच्या नोटा न स्विकारण्याचा प्रश्र्नच आला नाही. राज्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँकां ह्या रिझर्व्ह बँकेच्या बँकींग रेग्युलेशन अ‍ॅक्टनुसारच चालतात व त्यानुसारच त्यांना बँकींग परवाना मिळालेला असतो. त्यामुळे त्यांनी ५००  व १००० च्या नोटा स्विकारणे बंधनकारकच असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले.
कोल्हापूर जिल्हा बँकेच्या जिल्ह्यांत १९१ शाखा असून त्यामधून सुमारे ६० कोटी रुपयांचा बॅलन्स असतो. परंतू रिझर्व्ह बँकेच्या नव्या धोरणानुसार शंभर रुपयांच्याच नोटांचे वाटप करायचे असल्याने गुरुवारी कमी रक्कमेचे वाटप झाल्याचे बँकेचे व्यवस्थापकीय संचालक प्रतापसिंह चव्हाण यांनी सांगितले.