शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

अडचणीतील जिल्हा बँकांचे राज्य बँकेत विलीनीकरण! विविध कार्यकारी सोसायट्यांचाही अभ्यास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2017 02:13 IST

राज्यातील आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव असून त्याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना आज सहकार विभागाने केली.

मुंबई : राज्यातील आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे राज्य सहकारी बँकेत विलीनीकरण करण्याचा राज्य शासनाचा प्रस्ताव असून त्याचा अभ्यास करण्यासाठी एका समितीची स्थापना आज सहकार विभागाने केली.नाबार्डचे माजी अध्यक्ष डॉ. यशवंत थोरात यांच्या अध्यक्षतेखालील ही समिती विलिनीकरणासंदर्भातील अहवाल राज्य शासनाला तीन महिन्यांच्या आत सादर करेल. समितीच्या सदस्यांमध्ये सहकार आयुक्त डॉ. विजयकुमार झाडे, नाबार्र्ड; पुणेचे मुख्य सरव्यवस्थापक राजेंद्र कुलकर्णी, महाराष्ट्र अर्बन कोआॅपरेटीव्ह बँकस् फेडरेशनचे अध्यक्ष विद्याधर अनासकर, कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सेवानिवृत्त अतिरिक्त आयुक्त दिनेश ओऊळकर, सनदी लेखापाल डी. ए.चौगुले यांचा समावेश आहे.या १२ बँका आहेत अडचणीतनागपूर, वर्धा, यवतमाळ बुलडाणा, जालना, बीड, उस्मानाबाद, परभणी, नांदेड, धुळे-नंदुरबार, नाशिक, सोलापूर या १२ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका सध्या आर्थिकदृष्ट्या अडचणीत आहेत.

विविध कार्यकारी सोसायट्यांचाही अभ्यासराज्य सहकारी बँक-जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक-विविध कार्यकारी सहकारी सोसायटी-शेतकरी अशी कर्जवाटपाची साखळी असते. राज्यातील २१ हजार विविध कार्यकारी सोसायट्यांपैकी ११ हजार सोसायट्या सध्या तोट्यात आहेत. त्यांना सक्षम करण्यासाठीच्या उपाययोजनाही सुखदेव थोरात यांच्या अध्यक्षतेखालील समिती सुचविणार आहे.जिल्हा बँका अडचणीत असल्याचे निकष असे - कृषी कर्जवाटपाची त्यांची ऐपत नसते, त्यांचा संचित तोटा वर्षानुवर्षे वाढत जातो, त्यांचे नक्तमूल्य नकारात्मक असते. भांडवल तरलता प्रमाण (सीआरएआर) ९ टक्क्यांपेक्षा कमी असते.त्यामुळे बँकिंग परवाना रद्द होतो. बुडित कर्जे (एनपीए) अधिक आहे.

टॅग्स :bankबँक