शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांच्या जुन्या नोटा वटणार, ३० दिवसांची मुदत!

By admin | Updated: June 22, 2017 06:14 IST

नोटाबंदीनंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये जमा झालेले सुमारे २ हजार ७७१ कोटी मूल्याचे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली/मुंबई : नोटाबंदीनंतर राज्यातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांमध्ये जमा झालेले सुमारे २ हजार ७७१ कोटी मूल्याचे बाद चलन अखेर रिझर्व्ह बँक स्वीकारणार आहे. त्यामुळे सात महिन्यांपासून पडून असलेल्या ५00 व एक हजारच्या नोटा वटणार असल्याने शेतीच्या पतपुरवठ्याची कोंडी फुटण्यास मदत होणार आहे. रिझर्व्ह बँक २० जुलैपर्यंत जुन्या नोटा स्वीकारणार आहे.८ नोव्हेंबर २०१६ रोजी नोटाबंदी जाहीर झाल्यानंतर, जिल्हा सहकारी बँकांनी १३ नोव्हेंबरपर्यंत बाद नोटा स्वीकारल्या होत्या. मात्र, त्यानंतर त्यांना या नोटा स्वीकारण्यास किंवा बदलून देण्यास बंदी केली होती. ही कोंडी फोडण्यासाठी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यासह राज्य सरकारने केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. केंद्रीय अर्थमंत्रालयाने बुधवारी दिशानिर्देश जारी केले. शेतीसाठी लाभदायक निर्णय केंद्राच्या निर्णयामुळे जिल्हा बँकांकडे पुरेसा अर्थपुरवठा होण्यास मदत होणार आहे. शेतीला फायदा होईल. जेटली आणि रिझर्व्ह बँकेचा मी आभारी आहे. आता सहकारी बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना १० हजारांची उचल द्यावी. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीपतपुरवठ्याला गती २७ जिल्हा बँकांमध्ये दोन हजार ७७१ कोटींचे जुने चलन जमा झाले होते. ते आता पुन्हा व्यवहारात येईल, त्यामुळे कृषी पतपुरवठ्याला गती येईल.- प्रमोद कर्नाड, व्यवस्थापकीय संचालक, राज्य सहकारी बँकहोणार मोठा फायदाचुकीच्या मार्गाने रक्कम जमा करणाऱ्यांवर कारवाई करा, पण बँकांना त्याचा फटका बसू देऊ नका, अशी मागणी केली होती. शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे. - सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्रीसंबंधित नोटा १० ते १३ नोव्हेंबर काळात जमा केल्या आहेत व त्या ठरवून दिलेल्या कालावधीत का जमा केल्या नाहीत? याचा समर्थनीय खुलासा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पोस्ट कार्यालयासह अन्य व्यापारी बँकांना द्यावा लागणार आहे.तीन दिवसांत जिल्हा बँकांमध्ये काळा पैसा पांढरा करण्यासाठी कोट्यवधी रुपये जमा झाल्याचा संशय व्यक्त झाला होता. त्यामुळे विविध वित्तीय यंत्रणांनी नाशिक, जळगाव, कोल्हापूरसह बहुतांश जिल्हा बँकांमध्ये जुने चलन जमा झाल्याचा तपशीलही तपासला होता. कोणत्या बँकेत किती रक्कम?

573 पुणे341 नाशिक315 सांगली279 कोल्हापूर209 जळगाव