शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे वाटप

By admin | Updated: February 15, 2017 19:57 IST

मतदानाचा टक्का वाढविण्याचे प्रयत्न

नाशिक : मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने मतदारजागृती अभियान राबविण्याचे निर्देश देण्याबरोबरच मतदारांना घरपोहोच मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करण्याचेही आदेशित केले आहे. त्यानुसार, महापालिकेचे कर्मचारी प्रत्येक प्रभागातील मतदारांच्या घरोघरी जाऊन मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करणार असून, गुरुवार (दि.१६) पासून वितरणास सुरुवात होणार असल्याची माहिती सहायक निवडणूक अधिकारी व उपआयुक्त विजय पगार यांनी दिली.महापालिका निवडणुकीसाठी यंदा १० लाख ७४ हजार मतदार आहेत. यंदा मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने विशेष लक्ष घातले आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदारांपर्यंत त्यांच्या मतदान केंद्रांची माहिती जाऊन पोहोचावी याकरिता थेट मतदारांना मतदान चिठ्ठ्यांचे (व्होटर स्लीप) वाटप करण्यात येणार आहे. राज्य निवडणूक आयोगामार्फत पहिल्यांदाच असा प्रयोग राबविला जात आहे. आजवर निवडणुकांमध्ये राजकीय पक्षांसह संबंधित उमेदवारांकडूनच मतदारांना घरोघरी जाऊन मतदान चिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत असे. मतदान चिठ्ठ्या आल्याशिवाय घराबाहेर न पडणारेही असंख्य मतदार आहेत. मतदान चिठ्ठ्यांच्या माध्यमातून मतदारांना प्रत्यक्ष मतदान केंद्र कोठे आहे आणि मतदार यादीतील आपला अनुक्रमांक किती आहे, याची माहिती घरबसल्या मिळते. त्यामुळे मतदान केंद्रावर गेल्यावर फारशी शोधाशोध करावी लागत नाही आणि रेंगाळावेही लागत नाही. मतदान करणे सोपे जाते. त्यासाठी यंदा निवडणूक आयोगच मतदान चिठ्ठ्या घेऊन मतदारांच्या घरी जाणार आहे. त्यासाठी महापालिकेने कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडे मतदार चिठ्ठ्यांची जबाबदारी सोपविण्यात आली असून, वाटपासाठी घरपट्टी-पाणीपट्टी वसुली कर्मचारी, अंगणवाडी कर्मचारी यांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागात सुमारे १५० कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, गुरुवारपासून मतदान चिठ्ठ्यांचे वाटप केले जाणार असल्याचे विजय पगार यांनी सांगितले.