शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

गणेशमूर्तींच्या वितरणात मुसळधार पावसाचे विघ्न

By admin | Updated: August 3, 2016 02:48 IST

बाप्पाच्या आगमनाला अवघा महिनाभराचा कालावधी शेष राहिला आहे.

दत्ता म्हात्रे,

पेण- बाप्पाच्या आगमनाला अवघा महिनाभराचा कालावधी शेष राहिला आहे. पेणच्या कलाग्राम नगरी हमरापूर - जोहे - कळवे व पेण शहरातील गणेशमूर्तींचे देश-विदेशात वितरण सुरू झाले आहे. मात्र अतिवृष्टीमुळे बाप्पाच्या वितरणात विघ्न येत आहे. शनिवारपासून सुरु झालेल्या संततधारेचा जोर अजूनही कायम आहे. याचा फटका गणेशमूर्तिकारांना बसत आहे. खड्डेमय रस्ते, पावसाच्या संततधारेने टेम्पो व ट्रक्समध्ये मूर्ती भरताना अडथळा येत असल्याने नोंदणी केलेल्या आॅर्डर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात व शहरात नेताना विलंब होत आहे. यंदा गणेशोत्सव ५ सप्टेंबरपासून सुरु होत असल्याने गोवा, कर्नाटक, गुजरात या राज्यातील गणेशमूर्तींच्या आॅडर्स जूनच्या मध्यावधीतच पूर्ण झाल्याचे गणेशमूर्तिकारांचे म्हणणे आहे. मात्र महाराष्ट्राचा आराध्य असलेला बाप्पा महाराष्ट्र राज्याच्या ३६ जिल्ह्यातील प्रमुख शहरांसह त्या - त्या जिल्ह्यातील गावगाड्यातली मागणी ही साधारणपणे जुलै व आॅगस्ट महिन्यात पूर्ण केली जाते. सर्वात मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो तो कोकण किनारपट्टीसह, मुंबई, उपनगरे, पुणे व नाशिक शहरात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात एजंटांमार्फत गणेशमूर्तींची विक्री होण्यासाठी पेणच्या मूर्तीचे वितरण केले जाते. साधारणपणे पेण शहरातून १५ ते २० टेम्पो तर ग्रामीण हमरापूर - जोहे, (तांबडशेत), कळवे या कलाग्राम नगरीतून २० ते २५ गाड्या गणेशमूर्ती भरुन नेण्यात येतात. गेले आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातला असून रंगविलेल्या गणेशमूर्तींचे पॅकिंग करताना पावसामुळे विघ्न येत आहे. >15 ते २० टेम्पो तर ग्रामीण हमरापूर - जोहे, (तांबडशेत), कळवे या कलाग्राम नगरीतून २० ते २५ गाड्या गणेशमूर्ती भरुन नेण्यात येतात. गेले आठवडाभर पावसाने धुमाकूळ घातला असून रंगविलेल्या गणेशमूर्तींचे पॅकअप करताना पावसामुळे विघ्न येत आहे.