शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
2
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
3
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
4
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
5
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
6
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
7
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
8
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
9
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य
10
HDB Financial Services IPO चा प्राईज बँड ठरला; 'या' तारखेपासून लावता येणार बोली, पाहा डिटेल्स
11
SNB report: स्विस बँकेंत भारतीयांचा पैसा वाढला तिप्पट, आकडा ऐकून चक्रावून जाल!
12
'दक्षिणायन' ही देवांची रात्र का समजली जाते? या काळात कोणत्या गोष्टी टाळायला हव्या? वाचा!
13
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी
14
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
15
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
16
IND vs ENG : हेडिंग्लेच्या मैदानात कसा राहिलाय टीम इंडियाचा रेकॉर्ड? जाणून घ्या सविस्तर
17
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
18
दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र यावं असं वाटतं का? सायली संजीव म्हणाली- "त्या दोघांनाही..."
19
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
20
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?

महापुरुषांच्या पुतळ्यांना अंतराची सीमा

By admin | Updated: May 3, 2017 01:01 IST

सामान्य प्रशासन विभागाचा आदेश : पुतळ्यांची जबाबदारी संबंधित संस्थेवर

मुंबई/कोल्हापूर : एखाद्या महापुरुषांचे एकापेक्षा अधिक पुतळे एकाच गावात वा शहरात उभारण्यासाठी आता अंतराची सीमारेषा आखण्यात आली आहे. दोन किलोमीटरच्या आत असे पुतळे उभारता येणार नाहीत, असा आदेश मंगळवारी सामान्य प्रशासन विभागाने काढला. शिवाय, पुतळा उभारणाऱ्या संस्थेवर संबंधित पुतळ्याची देखभाल, पावित्र्य अन् मांगल्या राखण्याची जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. महापुरुषांचे पुतळे उभारण्यासंबंधी जारी करण्यात आलेल्या आदेशात काही नियम व अटी लागू करण्यात आल्या आहेत. त्यानुसार एखादा पुतळा उभारण्यापूर्वी त्या पुतळ्यासंबंधीच्या सर्व खर्चाची जबाबदारी पुतळा उभारणाऱ्या संस्थेतची असेल. तसे वचनपत्र घेण्यात येणार आहे. भविष्यात रस्ते रुंदीकरण वा अन्य विकास कामांमुळे पुतळा हलविण्याचा प्रसंग उद्भवल्यास त्यास विरोध न करता आवश्यक ती कार्यवाही स्वखर्चाने करण्याबाबत पुतळा उभारणाऱ्या संस्थेचे शपथपत्र घेण्यात येणार आहे. पुतळा उभारण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीला असतील. पूर्व परवानगीशिवाय पुतळा उभारणाऱ्या संबंधित व्यक्ती, संस्था वा समितीवर दंडात्मक व कायदेशीर कारवाई करून पुतळा हटविण्यात येणार आहे. पुतळा उभारणाऱ्या संस्थेने पुतळ्याच्या क्ले मॉडेलला कला संचालनालयाची मान्यता घेऊन ब्राँझ वा अन्य धातू, फायबर वा इतर साहित्यापासून पुतळा तयार करावा आणि मान्यता घेतलेल्या मॉडेलनुसारच पुतळा उभारावा, असा दंडक असेल. पुतळा उभारल्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, स्थानिक वाद वा जातीय तणाव वाढणार नाही या बाबतचे स्थानिक पोलीस कार्यालयाचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. (विशेष प्रतिनिधी) अशी असेल पाचजणांची समितीपुतळ्यासाठी परवानगी देणाऱ्या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असतील. महापालिकेचे आयुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता, निवासी उपजिल्हाधिकारी या पाचजणांची समिती असेल. निवासी उपजिल्हाधिकारी सदस्य सचिव असतील. आवश्यकता वाटल्यास पुतळा क्षेत्रातील संबंधित अधिकाऱ्यांना बैठकीसाठी आमंत्रित करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.