शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

अनुशेषाच्या बैठकीत वाजला दुष्काळाचा डंका !

By admin | Updated: August 25, 2015 02:31 IST

मराठवाडा अनुशेषाच्या बैठकीत सोमवारी दुष्काळाचा डंका वाजला. बैठकीत आर्थिक अनुशेष दूर करण्याबाबत फक्त चर्चा झाली. त्यातून ठोस असा कोणताही निर्णय जाहीर न करता

औरंगाबाद : मराठवाडा अनुशेषाच्या बैठकीत सोमवारी दुष्काळाचा डंका वाजला. बैठकीत आर्थिक अनुशेष दूर करण्याबाबत फक्त चर्चा झाली. त्यातून ठोस असा कोणताही निर्णय जाहीर न करता अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पिण्याचे पाणी आरक्षित करणे, रोजगार योजना लवचिक करणे, चारा छावण्यांच्या अध्यादेशात बदल करणे, सिंचन व रस्ते विकासासाठी आराखडा तयार करणे व केळकर समितीच्या अहवालाचा विचार करण्याची घोषणा केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीला अर्थमंत्र्यांसह परिवहनमंत्री दिवाकर रावते, पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट आदींसह ३० आमदार व खासदारांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे शिवसेनेचे कोणतेही लोकप्रतिनिधी बैठकीला हजर नव्हते. नाराजीचा सूर आळवत शिवसेनेचे खा. चंद्रकांत खैरे, आ. संजय शिरसाट, आ. नागेश आष्टीकर यांनी अनुशेष प्रकरणी बोलावलेल्या बैठकीतून अर्ध्या तासात काढता पाय घेतला. परभणी आणि नांदेडचे पालकमंत्री दिवाकर रावते हेसुद्धा अर्ध्या बैठकीतून निघून गेले. सर्व संस्था विदर्भात नेण्याचा सरकारचा घाट आहे. आयआयएमसारखी संस्था तिकडे नेली, असा आरोप खैरे यांनी केला. (प्रतिनिधी)