शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

चार नगरसेवकांवर अपात्रतेचे गंडांतर?

By admin | Updated: March 14, 2016 02:25 IST

बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चार नगरसेवकांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली राज्याच्या नगरविकास विभागाने सुरू केल्या आहेत

ठाणे : बांधकाम व्यावसायिक सुरज परमार यांच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या चार नगरसेवकांना पदावरून दूर करण्याच्या हालचाली राज्याच्या नगरविकास विभागाने सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यातील तरतुदीनुसार एक महिन्यात पालिका प्रशासनाने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करावी, अन्यथा शासनाकडून त्यासाठी योग्य ती कार्यवाही केली जाईल, असे पत्रच राज्य शासनाने ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना पाठविले आहे. नगरसेवकांना त्यांची बाजू मांडण्याची संधी दिली जाणार आहे. त्यानंतर, पालिकेच्या सभागृहात दोनतृतीयांश मतांनी अपात्रतेचा ठराव मंजूर करावा लागेल. पालिका सभागृहात असा ठराव मंजूर होणार की नाही, हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी महिनाभरात कारवाई झाली नाहीतर ‘त्या’ नगरसेवकांवर राज्य शासनाकडून कारवाईची शक्यता आहे. तसे झाल्यास पुढील सहा वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नसल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. दोषी नगरसेवकांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या गुन्ह्यासह लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हे दाखल झालेले आहेत. त्यांची वर्तणूक नगरसेवकपदास शोभणारी नसल्याचा ठपका ठेवत सरकारने हे पाऊल उचलले असून यासंबंधी त्यांना नोटिसाही बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली. परमार यांनी आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत मनसेचे नगरसेवक सुधाकर चव्हाण, काँग्रेसचे विक्र ांत चव्हाण, राष्ट्रवादीचे हणमंत जगदाळे आणि नजीब मुल्ला यांच्या नावांचा उल्लेख केला होता. पोलीस तपासात ही नावे स्पष्ट झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर, चौघेही काही काळ भूमिगत झाले होते. त्यांना अटक झाल्यानंतर काही अटीशर्तींवर त्यांची सव्वादोन महिन्यांच्या कालावधीनंतर जामिनावर मुक्तता झाली. आता राज्य शासनाने त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्याच्या हालचाली सुरू केल्याने पालिकेत एकच खळबळ उडाली आहे. ठाण्यातील या चार नगरसेवकांचे पद रद्द करण्याबाबतच्या हालचाली मंत्रालयात सुरू असल्याचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. (प्रतिनिधी)