शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
4
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
5
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
6
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
7
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
8
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
9
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
11
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
12
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
13
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
14
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
15
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
16
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
17
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
18
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण
19
₹450 कोटींचा बंगला अन् ₹639 कोटींचा डुप्लेक्स..; धनकुबेरांना आकर्षित करतेय वरळी 'सी फेस'
20
फक्त १० वर्षांत १ कोटीचा फंड कसा तयार करायचा? SIP मध्ये दरमहा किती गुंतवणूक करावी लागेल?

लघुवाद न्यायालयातील पाच ‘बेकायदा’ नेमणुका रद्द

By admin | Updated: April 25, 2017 02:33 IST

मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांनी पाच कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीरपणे केलेल्या आणि गेली २० वर्षे सुरु ठेवलेल्या नोकऱ्या उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत.

मुंबई : मुंबईतील लघुवाद न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांनी पाच कर्मचाऱ्यांच्या बेकायदेशीरपणे केलेल्या आणि गेली २० वर्षे सुरु ठेवलेल्या नोकऱ्या उच्च न्यायालयाने रद्द केल्या आहेत.उच्च न्यायालय प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसार या पाच कर्मचाऱ्यांना १६ नोव्हेंबर २०१५ रोजी कामावरून कमी केले गेले होते. याविरुद्ध या कर्मचाऱ्यांनी केलेल्या रिट याचिका न्या. सत्यरंजन धर्माधिकारी व न्या. बी. पी. कोलाबावाला यांच्या खंडपीठाने सोमवारी फेटाळल्या.संदीप तुळशीराम मोहिते (भोईवाडा), स्मृती संदेश लिंगायत (जोगेश्वरी-पू.) आणि अविनाश बंडू जाधव, उत्तम गंगाराम तांबे व सताश दामोदर साळवी (तिघेही शासकीय वसाहत, वांद्रे) अशी या कर्मचाऱ्यांची नावे आहेत. या सर्वांचे वडिल पूर्वी लघुवाद न्यायालयात नोकरीस होते. ते निवृत्त झाल्यावर त्यांच्या मुलांना सन १९९६-९७ मध्ये प्रथम हमाल म्हणून नेमले गेले. कालांतराने यापैकी लिंगायत व साळवी टंकलेखक/ लिपिक झाले तर जाधव बेलिफ झाले होते.लघुवाद न्यायालयाच्या प्रधान न्यायाधीशांनी सरकारी परिपत्रकांचा चुकीचा अर्थ लावून या नेमणुका केल्या असल्याने त्या मुळातच बेकायदा ठरतात. त्यामुळे आम्ही या नोकरीसाठी पात्र आहोत किंवा आम्ही प्रदीर्घ काळ काम करीत आहोत म्हणून आम्हाला नोकरीत नियमित केले जावे, ही याचिकाकर्त्यांची विनंती मान्य करता येणार नाही, असे खंडपीठाने नमूद केले.अन्य सरकारी कार्यालयांमध्ये केल्या जाणाऱ्या अशा नेमणुकांची प्रकरणे आमच्यापुढे येतात तेव्हा आम्ही कायद्याची कसोटी लावून त्या रद्द करतो. त्यामुळे खुद्द न्यायालयीन प्रशासनात असा बेकायदेशीरपणा अजिबात खपवून घेतला जाऊ शकत नाही, असेही न्यायमूर्तींनी म्हटले.या पाचही जणांच्या वडिलांनी निवृत्त होताना किंवा झाल्यावर यांची नावे नोकरीसाठी सुचविली होती. त्यानुसार नेमणुका करताना ज्या सरकारी परिपत्रकाचा आधार घेतला गेला त्यात निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्याच्या जागी, काम अडू नये म्हणून, रोजगार विनिमय कार्यालयातून नावे न मागविता, तीन महिन्यांसाठी हंगामी नेमणुक करण्याची अनुमती दिली होती. त्यानुसार या पाचही जणांना ‘हंगामी’ अशीच नियुक्तीपत्रे देऊन नेमले गेले. उच्च न्यायालय प्रशासनाने सन २००१ मध्ये इन्स्पेक्शन करताना ही बाब लक्षात आणून दिली होती. तरीही तेथील प्रधान न्याायधीशांनी सरकारी परिपत्रकांचा चुकीचा अर्थ लावून त्यांच्या नोकऱ्या सुरु ठेवल्या होत्या. खंडपीठ म्हणते की, मुळात निवृत्त होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यास आपल्या मुलांचे नाव नोकरीसाठी सुचविण्याचा अधिकार नसताना प्रधान न्याायधीश अशा प्रकारच्या नेणुका करूच शकत नाहीत.या सुनावणीत याचिकाकर्त्या कर्मचाऱ्यांसाठी अ‍ॅड. गुणरतन सदावर्ते यांनी, लघुवाद न्यायालय व उच्च न्यायालय प्रशासनातर्फे अ‍ॅड. सदीप नारगोळकर यांनी तर राज्य सरकारसाठी सहाय्यक सरकारी वकील सुषमा भेंडे यांनी काम पाहिले. (विशेष प्रतिनिधी)