शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
4
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
5
मिरा-भाईंदरमधील उड्डाणपूलाचा आकार बाटलीसारखा का? एमएमआरडीएच्या कामावर फडणवीसांचं स्पष्टीकरण
6
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
7
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
8
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
9
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
10
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
11
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
12
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
13
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
14
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
15
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
16
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
17
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
18
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
19
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

कोर्टात पान खाल्ल्याने झालेली बडतर्फी अखेर २४ वर्षांनी रद्द!

By admin | Updated: October 13, 2014 05:26 IST

पान चघळत न्यायालयात आल्याबद्दल दंडाधिका-यांनी शिक्षा केली व त्याची माहिती स्वत:हून कळविली नाही

मुंबई : पान चघळत न्यायालयात आल्याबद्दल दंडाधिका-यांनी शिक्षा केली व त्याची माहिती स्वत:हून कळविली नाही या कारणावरून सेवेतून बडतर्फ केलेल्या अमरावती मध्यवर्ती कारागृहातील एका कारागृह रक्षकास अखेर २४ वर्षांनी न्याय मिळाला आहे. हा कारागृह रक्षक पूर्ण सेवा करून निवृत्त झाला असे मानून त्यास पेन्शनसह सर्व निवृत्तीलाभ द्यावेत,असा आदेश न्यायालयाने दिला आहे.आज वयाच्या सत्तरीला आलेल्या ज्ञानेश्वर विठुजी घुडे यांना कारागृह प्रशासनाने, २६ वर्षांच्या सेवेनंतर ८ सप्टेंबर १९९० रोजी बडतर्फ केले होते. त्याविरुद्ध न्यायालयीन लढा देता देता सप्टेंबर २००३ मध्ये त्यांचे निवृत्तीचे वयही उलटून गेले. त्यामुळे न्या. अशोक भंगाळे व न्या. सी. व्ही. भडंग यांच्या नागपूर येथील खंडपीठाने त्यांची बडतर्फी बेकायदा ठरविली तरी त्यांना पुन्हा कामावर घेण्याचा आदेश दिला नाही. त्याऐवजी घुडे पूर्ण सेवा बजावून नियत वयोमानानुसार निवृत्त झाले आहेत, असे मानून त्यांना निवृत्तीच्या तारखेपासून पेन्शनसह सर्व निवृत्तीलाभ द्यावेत, असा आदेश दिला गेला.२६ वर्षांच्या सेवाकाळात घुडे यांच्यावर एकूण सात वेळा शिस्तभंगाची कारवाई झाली होती. त्यापैकी तीन वेळा त्यांची वार्षिक वेतनवाढ रोखली गेली होती व एकदा तर त्यांच्यावर ड्युटीवर असताना दारुच्या नशेत असभ्य वर्तन केल्याबद्दल कारवाई केली गेली होती. हे लक्षात घेऊन न्यायालयाने मागचा पगार देण्याचा आदेशही दिला नाही.घुडे २९ एप्रिल १९८८ रोजी रजेवर होते व खासगी कामासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी न्यायालयात गेले होते. तेथे पान चघळत न्यायालयात आल्याबद्दल दंडाधिकाऱ्यांनी त्यांना ५० रुपये दंड ठोठावला. घुडे यांचे हे वर्तन गणवेशधारी दलातील शिस्तबद्ध कर्मचाऱ्यास शोभनीय नाही. शिवाय न्यायालयाने केलेल्या या शिक्षेची माहिती घुगे यांनी स्वत:हून कळविलीही नाही, असे कारण देत त्यांना बडतर्फ केले गेले होते. मात्र त्यांचे हे वर्तन योग्य नव्हते हे मान्य केले तरी त्यासाठी दिलेली बडतर्फीची शिक्षा खूपच कठोर आहे, असे म्हणत न्यायालयाने ती रद्द केली. (विशेष प्रतिनिधी)