शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

रिकाम्या झोपड्यांचे रूपांतर कचरापेटीत

By admin | Updated: June 29, 2016 02:00 IST

मालाड मालवणी परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील अनेक झोपड्यांचे रूपांतर जीवघेण्या कचरापेटीत होत आहे.

मुंबई : मालाड मालवणी परिसरात असलेल्या झोपडपट्टीतील अनेक झोपड्यांचे रूपांतर जीवघेण्या कचरापेटीत होत आहे. परिसरात कचरा घेऊन जाण्यासाठी घंटागाड्याच येत नसल्यामुळे कचरा परिसरातील रिकाम्या झोपड्यांमध्ये टाकण्यात येत आहे. कचऱ्याने भरलेल्या या झोपड्या ढासळून किंवा त्यांना आग लागून दुर्घटना होण्याची भीती व्यक्त होत आहे. स्वच्छ मुंबई अभियानांतर्गत विशेषत: कचरावेचकांनी सर्व प्रकारचा कचरा प्रत्येकाच्या घरी जाऊन जमा करणे अनिवार्य आहे. मात्र मालवणीत कचरावेचक ठरावीक प्रकारचा कचराच घेऊन जातात, असे तेथील रहिवाशांनी ‘लोकमत’ला सांगितले. रिकामी शहाळी, गोण्या, पुठ्ठे अशा वस्तू नेण्यास ते सरळ नकार देतात. त्यामुळे हा कचरा घराबाहेर तसाच जमा राहतो. जो रात्रीच्या वेळी जवळपास असलेल्या रिकाम्या झोपड्यांमध्ये फेकला जातो. परिणामी, या झोपड्यांना आता मोठमोठ्या कचरापेट्यांचे स्वरूप प्राप्त झाले आहे. या झोपड्या साध्या पत्र्याच्या असल्यामुळे कचऱ्याच्या वजनाने त्या कधीही ढासळून अपघात होऊ शकतो. तसेच या कचऱ्यामुळे रोगराईला आमंत्रण मिळत आहे. (प्रतिनिधी)घंटागाडी गेली कुणीकडे?कचरा जमा करण्यासाठी पहाटे ७ ते दुपारी १२दरम्यान घंटागाडी या परिसरात फिरणे गरजेचे आहे. मात्र मालवणीत अनेक ठिकाणी घंटागाडीचे दर्शनच होत नाही. कागदोपत्री मात्र या गाड्या नियमितपणे फिरत असल्याचे दाखवले जाते. नियमितपणे कचरा जमा केला जातो तर ठिकठिकाणच्या झोपड्या या कचरापेट्यांमध्ये का रूपांतरित झाल्या आहेत, हा प्रश्नच आहे.‘कारवाई करू’‘आम्ही या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. त्यावर योग्य ती कारवाई केली जाईल,’ अशी माहिती पालिकेच्या पी उत्तरच्या घनकचरा विभागाचे सहायक अभियंता प्रकाश गायकर यांनी ‘लोकमत’ला दिली.