शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
2
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
3
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
4
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
5
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
6
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
7
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
8
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
9
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
10
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
11
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
12
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
13
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
14
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
15
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
16
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
17
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
18
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
19
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
20
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू

आॅनलाइन पेपर तपासणीवर नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2017 04:35 IST

मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालामध्ये पारदर्शकता यावी, म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या उत्तरपत्रिका तपासणी आणि निकालामध्ये पारदर्शकता  यावी, म्हणून मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख यांनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणी पद्धत यंदाच्या परीक्षांपासून लागू केली. पण सर्व शाखांना सरसकट ही पद्धत लागू केल्यामुळे राज्य सरकारच्या  उच्च व तंत्रशिक्षण विभागाने  नाराजी व्यक्त केली आहे. ही  पद्धत टप्प्याटप्प्याने राबविण्यात  यावी, असे मत उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने व्यक्त  केले आहे.  दोनदा निविदा प्रक्रियेला  वाढीव वेळ दिल्यानंतर शुक्रवारी अखेर एका कंपनीची निवड करण्यात  आली. त्यानंतर आता ४ मेपासून उत्तरपत्रिका तपासणीची सुरुवात होणार आहे. या वर्षी  मार्च-एप्रिलमध्ये झालेल्या  सर्व परीक्षांच्या उत्तरपत्रिका या आॅनलाइन पद्धतीने तपासण्यात येणार आहेत.  त्यामुळे पहिल्याच वेळी २२ लाख उत्तरपत्रिका तपासण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यामध्ये अनुभवी प्राध्यापकांऐवजी अन्य प्राध्यापकांना आॅनलाइन तपासणी प्रशिक्षणासाठी पाठवण्यात आले आहे. यामुळे निकाल लवकर लागतील, अडथळे येणार नाहीत, असा विश्वास विद्यापीठाने व्यक्त केला होता.  पण सर्व शाखांसाठी ही  पद्धत लागू केल्याने तसेच विनाअनुभवी प्राध्यापकांना पेपर तपासणीची जबाबदारी दिल्यामुळे निकालावर परिणाम होऊ शकतो, अशी शक्यता उच्च शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने वर्तविली आहे. विद्यापीठाच्या या निर्णयाला उच्च शिक्षण विभागातील  सदस्यांनी नाराजी व्यक्त केली असल्याची माहिती मॅनेजमेंट कौन्सिलच्या सदस्यांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)पायाभूत सुविधा देण्याचे काम सुरूप्रत्येक वेळी मुंबई विद्यापीठाचे निकाल रखडत असल्यामुळे टीकेचे धनी व्हावे लागते. त्यामुळे यावर उपाय म्हणून कुलगुरूंनी आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीचा पर्याय निवडला. या प्रक्रियेसाठी मॅनेजमेंट कौन्सिलच्या झालेल्या बैठकीत कंपनीची निश्चिती करण्यात आली. या कंपनीने काम सुरू केले आहे. कागदपत्रांची पूर्तता आणि पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम सध्या सुरू आहे. त्यानंतर उत्तरपत्रिका तपासणीला सुरुवात होणार आहे.