मुंबई : वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीची लिंक आपल्या फेसबुकवरून भाजपा राष्ट्रीय प्रवक्त्या आणि फॅशन डिझायनर शायना एनसी यांनी शेअर केली. त्यावर एमआयएम पक्षाच्या शेख अकमल आझमी यांनी अपमानास्पद आणि बदनामीकारक कमेंट केल्याने, शायना एनसी यांनी मलबार हिल पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे.१८ एप्रिलला एका वाहिनीसाठी शायना एनसी यांनी विशेष मुलाखत दिली. यात पंतप्रधान आणि सरकारच्या कामाची प्रशंसा केली. मुलाखतीची लिंक वाहिनीने टिष्ट्वटर हँडलवर तर शायना एनसी यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केली. त्यावर अपमानास्पद कमेंट्स येताच शायना एनसी यांनी पोस्ट डिलिट करून पोलिसांत धाव घेतली.
शायना एनसी यांच्याबाबत अपमानास्पद वक्तव्य
By admin | Updated: April 23, 2017 02:32 IST