शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

स्मशानजोगी समाजाची जात पंचायत बरखास्त

By admin | Updated: November 7, 2015 02:56 IST

शेकडो वर्षांपासून सुरू असलेली व शोषणास कारणीभूत ठरणारी स्मशानजोगी समाजातील जात पंचायत शुक्रवारी बरखास्त करण्यात आली़ पंचांनीच ही घोषणा करत राज्यघटनेलाच

अहमदनगर : शेकडो वर्षांपासून सुरू असलेली व शोषणास कारणीभूत ठरणारी स्मशानजोगी समाजातील जात पंचायत शुक्रवारी बरखास्त करण्यात आली़ पंचांनीच ही घोषणा करत राज्यघटनेलाच आम्ही प्रमाण मानणार, असे स्पष्ट केले़हमाल पंचायत सभागृहातील बैठकीला स्मशानजोगी समाजाचे राज्यातील प्रतिनिधी उपस्थित होते़ अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पुढाकारातून हा महत्त्वपूर्ण निर्णय झाला़ आंध्र प्रदेशातून आलेल्या स्मशानजोगी समाजाची महाराष्ट्रात मोठी संख्या आहे़ जिल्ह्यातील शेवगाव व नेवासा तालुक्यात हा समाज अनेक वर्षांपासून स्थायिक आहे़ शेकडो वर्षांपासून जात पंचायत व्यवस्था कार्यरत होती़ शेवगाव, सिल्लोड, लातूर, बीड, परभणी आदी ठिकाणी पंचायती भरवण्यात येत. जात पंचायतीतील निर्णय देताना पीडितांसह समोरच्यांकडूनही पैसे घेतले जात़ अधिक पैसे देणाऱ्यांच्या बाजूने निर्णय देण्याचे प्रकार गेल्या काही वर्षांत वाढले होते. वाळीत टाकणे, नातेसंबंध तोडणे, समाजातून बरखास्त करणे असे शोषण सुरू होते. तक्रारी अंनिसकडे आल्यानंतर जिल्हा कार्याध्यक्ष रंजना गवांदे यांनी पुढाकार घेऊन प्रबोधन केले़ (प्रतिनिधी)शेकडो वर्षांचा विळखा सैल ‘पंचायत बरखास्त झाली आता बरकत येईल’, अशी भावना समाजातील लोकांनी व्यक्त केली़ शासनाने समाजाला शिक्षण, आरोग्यासह इतर मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी भावना बैठकीतील उपस्थितांनी व्यक्त केली़