काँग्रेसची विदर्भ विभागीय बैठक : माणिकराव ठाकरे यांची मागणीनागपूर : भारतीय जनता पक्षाकडे बहुमत नाही. विधानसभेत विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी त्यांनी घटनेची पायमल्ली केली. पुन्हा बहुमत सिद्ध करीत नाही तोपर्यंत राज्य सरकार बरखास्त करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी शनिवारी केली. काँग्रेसतर्फे शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी ८ डिसेंबरला विधानभवनावर मोर्चा काढला जाणार आहे. या मोर्चाच्या तयारीसाठी प्रदेश काँग्रेस कमिटीतर्फे माहेश्वरी भवन येथे आयोजित विदर्भ विभागीय आढावा बैठकीत ते बोलत होते. मोर्चाचे संयोजक व माजी मंत्री नितीन राऊ त, माजी राज्यमंत्री राजेंद्र मुळक, शहर काँग्रेसचे अध्यक्ष विकास ठाक रे, माजी खासदार गेव्ह आवारी, अझहर हुसैन, आमदार अमर काळे, अनिस अहमद, लक्ष्मणराव तायडे, मारोतराव कुंभलकर, जिल्हा काँग्रेसच्या अध्यक्ष सुनीता गावंडे, नामदेव उसेंडी, संजय खोडके, प्रफुल्ल गुडधे, प्रदेश सचिव मुन्ना ओझा, हुकुमचंद आमधरे, अभिजित वंजारी आदीसह विदर्भातील पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्यासपीठावर उपस्थित होते.ठाकरे म्हणाले, राज्यात यंदाचा दुष्काळ १९७२ पेक्षाही गंभीर आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत असल्याने सरकारने त्यांना आर्थिक पॅकेज द्यावे. पीक बुडाल्याने सोयाबीन व धान उत्पादक शेतकाऱ्यांना हेक्टरी २५ हजार तर कापसाला प्रति क्विंटल सहा हजार रुपये भाव ठरवून द्यावा. बाजारभावातील रक्कम सरकारने बोनस म्हणून जाहीर करावी. ऊ स उत्पादकांना भाव जाहीर करावा, फळबागांना हेक्टरी ५० हजारांची मदत देण्याची मागणी केली. मागील तीन वर्षात राज्य सरकारने शेतकऱ्यांना चार हजार कोटींची आर्थिक मदत दिली. परंतु भाजप नेतृत्वातील सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर उदासीन आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासह विविध मागण्यांसाठी काँग्रेसतर्फे ८ डिसेंबरला विधानभवनावर हल्लाबोल करणार आहोत. या मोर्चात विदर्भातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी होतील. अहमदनगर जिल्ह्यातील जवखेडा येथील हत्याकांडातील आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. मोर्चाचे नेतृत्व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, नारायण राणे, माजी कें द्रीय मंत्री मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार आदी करणार आहेत. तत्पूर्वी १ व २ डिसेंंबरला राज्यभरात तहसील व जिल्हा कार्यालयावर मोर्चे, ४ डिसेंबरला रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे. मतदारांनी काँग्रेसला विरोधी पक्षाची जबाबदारी दिली असल्याने काँग्रेस सशक्त विरोधी पक्षाची भूमिका पार पाडणार आहे. आंदोलनासोबतच अधिवेशनात पहिल्याच दिवशी विधान परिषदेत सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जाब विचारणार असल्याचे राजेंद्र मुळक म्हणाले. यावेळी शेखर शेंडे, बबनराव चौधरी, अतुुल कोटेचा, कृष्णकुमार पांडे, झिया पटेल, कुणाल राऊ त यांच्यासह काँग्रेस, महिला काँग्रेस व युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव मांडावाआजवर विदर्भावर अन्यायच झाला. निवडणुकीत याचा काँग्रेसला फटका बसला. काँग्रेसने अधिवेशनात वेगळ्या विदर्भाचा प्रस्ताव आणावा, असे मत नितीन राऊ त यांनी मांडले. केंद्र व राज्यातील सरकारचा कारभार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यानुसार चालत असल्याची टीका त्यांनी केली.आमदारांचे निलंबन घटनाबाह्यविधानसभेत भाजपचे बहुमत नाही. त्यांची बहुमत सिद्ध करण्याची पद्धती नियमबाह्य आहे. कोणतेही गैरकृ त्य केले नसताना करण्यात आलेले काँगे्रस आमदारांचे निलंबन घटनाबाह्य आहे. त्यांचे निलंबन रद्द करण्यात यावे, अशी मागणी ठाकरे यांनी केली.
राज्य सरकार बरखास्त करा
By admin | Updated: November 30, 2014 00:59 IST