शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अनुदान परत देण्याची विद्यापीठावर नामुश्की

By admin | Updated: March 3, 2017 05:59 IST

मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये डॉ. राममनोहर त्रिपाठी हिंदी भाषा भवन बनविण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले

मुंबई : तीन वर्षांपूर्वी मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमध्ये डॉ. राममनोहर त्रिपाठी हिंदी भाषा भवन बनविण्यासाठी भूमिपूजन करण्यात आले होते. पण गेल्या तीन वर्षांत एक इंचही काम झाले नाही आणि २ कोटी रुपये तसेच विद्यापीठाच्या तिजोरीत असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस वित्त व लेखा विभागाने दिली आहे. नुकतेच मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी जारी केलेल्या आदेशामुळे २ कोटी रुपयांवर पाणी सोडावे लागणार असून, यात मुंबई विद्यापीठाचा नाकर्तेपणा सिद्ध होत आहे आणि २ कोटींचे अनुदान परत देण्याची नामुश्की ओढावली आहे.आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे डॉ. राममनोहर त्रिपाठी हिंदी भाषा भवनबाबत शासनाने दिलेला निधी आणि झालेल्या खर्चाबाबत माहिती विचारली होती. मुंबई विद्यापीठाच्या वित्त व लेखा विभागाने अनिल गलगली यांस कळविले की, २ कोटी रुपये शासनाकडून प्राप्त झाले होते त्यापैकी २ लाख ५० हजार २८० रुपये खर्च करण्यात आले आहेत. तत्कालीन कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांनी डॉ. राममनोहर त्रिपाठी हिंदी भाषा भवनाचा प्रस्ताव व्यवस्थापकीय समितीत आणलाच नाही, त्यामुळे भवनाचे बांधकाम काम सुरू होऊ शकले नाही. विद्यापीठ अभियंता यांनी स्पष्ट केले आहे की, प्रस्ताव १८ नोव्हेंबर २०१६ रोजीच्या व्यवस्थापन समितीच्या बैठकीपुढे ठेवला असून, कार्यवृत्त प्राप्त झाल्यानंतर पुढील उचित कार्यवाही होईल. वेळोवेळी पत्रव्यवहार आणि दूरध्वनीवर संपर्क करूनसुद्धा उपयोगिता प्रमाणपत्र किंवा रक्कमवापर केला नसल्यास ती परतदेखील करण्यात आली नाही, याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)>आता खर्च केल्यास वित्तीय अनियमिततामुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी यांनी १३ फेब्रुवारी २०१७ रोजी मुंबई विद्यापीठास पत्र पाठवून ताकीद दिली आहे की, ३१ मार्च २०१६पूर्वी रक्कम खर्च न केल्याने आता ही रक्कम खर्च केल्यास ती वित्तीय अनियमतिता मानली जाईल. >राज्यपालांना पत्र लिहून चौकशीची मागणीगलगली यांनी कुलपतींना पत्र पाठवून कुलगुरू डॉ. संजय देशमुख तसेच माजी कुलगुरू डॉ. राजन वेळूकर यांची चौकशी करत अशा प्रकारे शासनाचा निधी खर्च न झाल्याबाबत कार्यवाहीची मागणी केली आहे. तसेच हिंदी भाषा भवनबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची विनंती केली आहे.