शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
3
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
4
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
5
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
6
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
7
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
8
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
9
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
10
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
11
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
12
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
13
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
14
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
15
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
16
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
17
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
18
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
19
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
20
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
Daily Top 2Weekly Top 5

कर्जाच्या नावाखाली फसवणारा अटकेत

By admin | Updated: May 21, 2016 05:09 IST

कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महाठगाला गुन्हे शाखेने गोरेगाव येथून अटक केली

मुंबई : व्यवसायासाठी कोट्यवधी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली व्यावसायिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या महाठगाला गुन्हे शाखेने गोरेगाव येथून अटक केली आहे. या ठगाने अनेकांची फसवणूक केली असल्याचे तपासात समोर येत आहे.सांगली येथील शासकीय कंत्राटदार संतोष चौगुले यांची भागीदारीमध्ये एक कंपनी असून त्यांच्या कंपनीला शासनाकडून रस्ते बांधण्याचे काम मिळते. या कंपनीच्या भागीदारांचा व्यवसाय वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैशांची गरज होती. दरम्यान, या भागीदारांपैकी एकाची ओळख करणसिंग चौहान याच्यासोबत होती. मुंबईतील गोरेगाव येथे राहणारा करणसिंग चौहान याच्याकडे या भागीदारांनी संपर्क साधून कर्ज काढण्याबाबत चर्चा केली़ २५ कोटी रुपयांचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष त्याने दाखवले. मात्र यावर २ टक्के कमिशन देण्याचे सांगितले. कंत्राटदार असलेल्या संतोष चौगुले आणि भागीदाराने कंपनीची सर्व कागदपत्रे चौहानकडे सोपवली. याबाबत अंधेरी न्यायालयात करार करण्यात आला. या करारादरम्यान चौगुले यांनी चौहानला पुढच्या तारखेचे ९ धनादेश दिले होते. चौहान या महाठगाने चौगुले यांनी दिलेल्या धनादेशांवरील तारखांमध्ये फेरफार करून ते धनादेश वटवून ५० लाख रुपये काढून घेतले. कर्जाचे काम होत नसल्याने त्यांच्या भागीदाराने चौहानकडे चौकशी केली असता तो त्यांना टाळू लागला होता. अखेर आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच कंत्राटदार संतोष चौगुले यांनी तक्रार दाखल केली होती. आरोपी गोरेगाव येथे येणार असल्याची माहिती गुन्हे शाखा कक्ष १चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे यांना मिळाली. या प्रकरणी गुन्हे शाखेने सापळा रचून चौहानला अटक केली. चौहान याने यापूर्वीदेखील पुणे, मुंबईसह नाशिक, ठाणे या ठिकाणी याप्रकारे अनेकांची फसवणूक केली असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष बागवे यांनी दिली.