शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

विसर्जन मिरवणुकीत ढोल-ताशाही डीजेला भारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2016 00:45 IST

गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल-ताशाचा आव्वाज डीजेला भारी पडला आहे. लक्ष्मी रस्त्यावर ढोलांच्या आवाजाने अनेकदा १०० डेसिबलची पातळी ओलांडली

पुणे : गणेश विसर्जन मिरवणुकीत पारंपरिक वाद्य असलेल्या ढोल-ताशाचा आव्वाज डीजेला भारी पडला आहे. लक्ष्मी रस्त्यावर ढोलांच्या आवाजाने अनेकदा १०० डेसिबलची पातळी ओलांडली, तर डीजेचा दणदणाट जवळपास ११० डेसिबलपर्यंत पोहचला होता. सकाळी ६ वाजल्यानंतर डीजेच्या गोंगाटात वाढ झाल्याचे दिसून आले.कॉलेज आॅफ इंजिनिअरींगच्या उपयोजित विज्ञान विभागाच्या १० विद्यार्थ्यांनी लक्ष्मी रस्त्यावर ध्वनीप्रदुषणाची पातळी मोजली आहे. लक्ष्मी रस्त्यावर मिरवणुक सुरू झाल्यापासून सकाळी आठ वाजेपर्यंत दहा चौकांमध्ये या विद्यार्थ्यांनी आवाजाची पातळी तपासली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत ध्वनीपातळी कमी झाली असली तरी मिरवणुकीचा वेळ मात्र कमी झालेला नाही. त्यामुळे आवाज कमी होवूनही त्याचा परिणाम तितकाच जाणवला. संपुर्ण लक्ष्मी रस्त्यावर २४ तासातील एकंदर आवाजाची सरासरी पातळी ९२.६ डेसिबल नोंदविली गेली. त्यामध्ये ढोल-ताशा व डीजेच्या आवाजात फारसा फरक जाणवला नाही, असेही महत्वपुर्ण निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. साधारणपणे माणसाचे कान ७० ते ८० डेसिबल आवाज सहन करू शकतात. लक्ष्मी रस्त्यावर बेलबाग चौक ते लोकमान्य टिळक चौकापर्यंत ध्ननीपातळी एकदाही ८५ डेसिबलच्या खाली आली नाही. गुरूवारी दुपारी १२ वाजता या चौकांमध्ये सरासरी ९०.६ डेसिबल तर रात्री ८ वाजता सरासरी ९३.७ डेसिबल आवाजाची नोंद झाली. दुपारी चार वाजता कुंटे चौकात ढोल-ताशाच्या आवाजाने शंभरी ओलांडली. हा आवाज १०३.८ डेसिबलपर्यंत पोहचला. रात्री बारानंतर सकाळी सहा वाजेपर्यंत हा आवाज काहीसा कमी होता. तरीही पहाटे चार वाजता ध्वनीपातळी सरासरी ८८ डेसिबलपर्यंत पोहचली होती. पहाटे चार वाजता होळकर चौकात सर्वाधिक ९६.७ डेसिबल आवाज होता. सकाळी आठ वाजता मात्र डीजेचा दणदणाट १०० च्या आसपास होता. ‘डीजे’ने वाढवला आव्वाज... : नियमानुसार रात्री बारानंतर सर्वच रस्त्यांवरील डीजे बंद करण्यात आले. काही मंडळे आवाज बंद केल्यानंतर मोरयाच्या जयघोषात पुढे गेली. मात्र, अनेक मंडळांनी रस्त्याच्या कडेला रथ उभे करून सकाळी सहा वाजण्याची वाट पाहिली. सकाळी सहा वाजल्यानंतर पुन्हा डीजेचा दणदणाट सुरू झाला. लक्ष्मी रस्त्यासह केळकर, कुमठेकर आणि टिळक रस्त्यावरही डीजेच्या आवाजाने धुमाकुळ घालण्यास सुरूवात केली. यावेळी तरूणाईची गर्दी असल्याने ‘डीजे’चा आवाज आणखीनच वाढला. त्यामुळे तरूणाईच्या उत्साहालाही उधाण आले. परिणामी मंडळांच्या मिरवणुका पुढे सरकतच नव्हत्या. त्यामुळे पोलिसांना अनेकदा हस्तक्षेप करावा लागला. आवाजाची पातळी सातत्याने वाढतच चालली होती. टिळक चौकात चारही रस्त्यांनी टिळक चौकात मिरवणुका आल्यानंतर तर कान बधिर होवून गेले. डीजेच्या आवाजाची स्पर्धा असल्यासारखे चित्र पाहायला मिळाले.